S M L

नांदेड पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मनसेला ऑफर

17 सप्टेंबरनांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढच्या महिन्यात होणार्‍या निवडणुकीसाठी मनसेनंही महायुतीत सामील व्हावं, अशी ऑफर शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून उत्तर देऊ असं मनसेचे संपर्क प्रमुख उदय सावंत यांनी दिली. ऑफर स्वीकारली तर आम्हाला 81 जागांपैकी किमान 15 जागा हव्या आहेत, असंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. 14 ऑक्टोबरला नांदेड वाघाळा महापालिकेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी मनसेला सोबत घेण्यास स्पष्टपणे विरोध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 09:09 AM IST

नांदेड पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मनसेला ऑफर

17 सप्टेंबर

नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढच्या महिन्यात होणार्‍या निवडणुकीसाठी मनसेनंही महायुतीत सामील व्हावं, अशी ऑफर शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून उत्तर देऊ असं मनसेचे संपर्क प्रमुख उदय सावंत यांनी दिली. ऑफर स्वीकारली तर आम्हाला 81 जागांपैकी किमान 15 जागा हव्या आहेत, असंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. 14 ऑक्टोबरला नांदेड वाघाळा महापालिकेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी मनसेला सोबत घेण्यास स्पष्टपणे विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close