S M L

माजी सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांचं निधन

15 सप्टेंबरराष्ट्रीय सेवा संघाचे माजी सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांचं आज रायपूरमध्ये ह्रद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या नागपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुदर्शन यांनी आपलं जीवन संघकार्याला वाहून घेतलं होतं. वयाच्या 9 व्या वर्षी सुदर्शन यांनी संघाच्या शाखेत प्रवेश केला होता. सुदर्शन यांचा जन्म 1931 साली छत्तीसगढ येथील रायपूर या गावी झाला. त्यांनी सागर युनिवर्सिटीमधून इलेक्ट्रानिक बीटेक डिग्री प्राप्त केली. 2002 साली त्यांची सरसंघचालकपदी निवड झाली. 2009 पर्यंत ते सरसंघचालकपदावर कार्यरत होते. तब्बल 45 वर्ष त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केलं. भाजपचे जेष्ठ लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी निवृत्त व्हावे आणि तरुणांना संधी द्यावी असं विधान करुन भाजपात खळबळ उडवून दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 10:36 AM IST

माजी सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांचं निधन

15 सप्टेंबर

राष्ट्रीय सेवा संघाचे माजी सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांचं आज रायपूरमध्ये ह्रद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या नागपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुदर्शन यांनी आपलं जीवन संघकार्याला वाहून घेतलं होतं. वयाच्या 9 व्या वर्षी सुदर्शन यांनी संघाच्या शाखेत प्रवेश केला होता. सुदर्शन यांचा जन्म 1931 साली छत्तीसगढ येथील रायपूर या गावी झाला. त्यांनी सागर युनिवर्सिटीमधून इलेक्ट्रानिक बीटेक डिग्री प्राप्त केली. 2002 साली त्यांची सरसंघचालकपदी निवड झाली. 2009 पर्यंत ते सरसंघचालकपदावर कार्यरत होते. तब्बल 45 वर्ष त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केलं. भाजपचे जेष्ठ लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी निवृत्त व्हावे आणि तरुणांना संधी द्यावी असं विधान करुन भाजपात खळबळ उडवून दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close