S M L

पावसाचं पाणी अडवून शेतकर्‍यांनी केली दुष्काळावर मात

15 सप्टेंबरसरकारने राज्यातील 123 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. पण उपाययोजनेबाबत शासन उदासीन आहे. अशाचं दुष्काळग्रस्त सेलू तालुक्यातील जलपूर्ती सिंचन संस्थेनं शेतकर्‍यांच्या मदतीनं दुष्काळावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पावसाळ्यात डोंगरावरुन येणारं पाणी वाहून वाया जातं. मात्र या संस्थेनं 40 लाख रुपये खर्च करुन 5 किलोमिटर लांबीच्या कालव्याच्या माध्यमातून डोंगरातून येणारं पाणी परीसरात फिरवलंय. या पाण्याचा वापर कापूस,सोयाबीन आणि उसाच्या पिकाला होतोय. त्याच बरोबर पाणी जमिनीत जिरल्यानं परीसरातल्या विहिरींनाही बारमाही पाणी उपलब्ध होतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 12:23 PM IST

पावसाचं पाणी अडवून शेतकर्‍यांनी केली दुष्काळावर मात

15 सप्टेंबर

सरकारने राज्यातील 123 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. पण उपाययोजनेबाबत शासन उदासीन आहे. अशाचं दुष्काळग्रस्त सेलू तालुक्यातील जलपूर्ती सिंचन संस्थेनं शेतकर्‍यांच्या मदतीनं दुष्काळावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पावसाळ्यात डोंगरावरुन येणारं पाणी वाहून वाया जातं. मात्र या संस्थेनं 40 लाख रुपये खर्च करुन 5 किलोमिटर लांबीच्या कालव्याच्या माध्यमातून डोंगरातून येणारं पाणी परीसरात फिरवलंय. या पाण्याचा वापर कापूस,सोयाबीन आणि उसाच्या पिकाला होतोय. त्याच बरोबर पाणी जमिनीत जिरल्यानं परीसरातल्या विहिरींनाही बारमाही पाणी उपलब्ध होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close