S M L

श्रीलंकेची विजयी सलामी

18 सप्टेंबरटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅचमध्ये अपेक्षेप्रमाणेच यजमान श्रीलंकेनं विजयी सलामी दिली आहे. अजंथा मेंडीसची जादूई स्पीन आणि जीवन मेंडीसची ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेनं झिम्बाब्वेचा 82 रन्सनं दणदणीत पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या लंकेनं 4 विकेट गमावत 182 रन्सचा स्कोर उभा केला. याला उत्तर देताना झिम्बाब्वेची टीम 100 रन्समध्ये गारद झाली. अजंथा मेंडीसनं फक्त 8 रन्समध्ये 6 विकेट घेत झिम्बाब्वेच्या बॅटिंगमधली हवाच काढून टाकली. झिम्बाब्वेतर्फे ओपनिंगला आलेल्या मासाकाड्झानं सर्वाधिक 20 रन्स केले. तर तब्बल 4 बॅट्समन शुन्यावर आऊट झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 05:43 PM IST

श्रीलंकेची विजयी सलामी

18 सप्टेंबर

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅचमध्ये अपेक्षेप्रमाणेच यजमान श्रीलंकेनं विजयी सलामी दिली आहे. अजंथा मेंडीसची जादूई स्पीन आणि जीवन मेंडीसची ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेनं झिम्बाब्वेचा 82 रन्सनं दणदणीत पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या लंकेनं 4 विकेट गमावत 182 रन्सचा स्कोर उभा केला. याला उत्तर देताना झिम्बाब्वेची टीम 100 रन्समध्ये गारद झाली. अजंथा मेंडीसनं फक्त 8 रन्समध्ये 6 विकेट घेत झिम्बाब्वेच्या बॅटिंगमधली हवाच काढून टाकली. झिम्बाब्वेतर्फे ओपनिंगला आलेल्या मासाकाड्झानं सर्वाधिक 20 रन्स केले. तर तब्बल 4 बॅट्समन शुन्यावर आऊट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close