S M L

पाकिस्तानची भारतावर 5 विकेटनं मात

17 सप्टेंबरटी-20 वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण त्याआधीच भारतीय टीमच्या मिशन टी-20 वर्ल्ड कपला मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यामध्ये चांगल्या स्कोरनंतरही भारताला पाकिस्तानविरुध्द पराभव पत्करावा लागला. कामरान अकमलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताचा 5 विकेटनं पराभव केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय फास्ट बॉलर्सनं केलेली खराब बॉलिंग भारताच्या पराभवाचं कारण ठरली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 186 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहली आणि रोहित शर्माने फटकेबाजी करत भारताला मोठा स्कोर उभा करुन दिला. कोहलीनं 75 रन्स केले. याला उत्तर देताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकचे 4 बॅट्समन 84 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर कामरान अकमल आणि शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अकमलनं 6 सिक्स आणि 5 फोर मारत नॉटआऊट 92 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 01:27 PM IST

पाकिस्तानची भारतावर 5 विकेटनं मात

17 सप्टेंबर

टी-20 वर्ल्ड कपला उद्यापासून सुरुवात होत आहे. पण त्याआधीच भारतीय टीमच्या मिशन टी-20 वर्ल्ड कपला मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यामध्ये चांगल्या स्कोरनंतरही भारताला पाकिस्तानविरुध्द पराभव पत्करावा लागला. कामरान अकमलच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्ताननं भारताचा 5 विकेटनं पराभव केला. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय फास्ट बॉलर्सनं केलेली खराब बॉलिंग भारताच्या पराभवाचं कारण ठरली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 186 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहली आणि रोहित शर्माने फटकेबाजी करत भारताला मोठा स्कोर उभा करुन दिला. कोहलीनं 75 रन्स केले. याला उत्तर देताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकचे 4 बॅट्समन 84 रन्सवर आऊट झाले. पण यानंतर कामरान अकमल आणि शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अकमलनं 6 सिक्स आणि 5 फोर मारत नॉटआऊट 92 रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close