S M L

ज्योतिकुमारीच्या मारेकर्‍यांना फाशीच

17 सप्टेंबरपुण्यातल्या ज्योतिकुमारी चौधरी हत्या प्रकरणातल्या दोन आरोपींच्या फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटे या दोघांनी 2007 मध्ये ज्योतिकुमारीचा बलात्कार करुन खून केला होता. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्योतिकुमारी हिंजवडी आयटी पार्कमधल्या विप्रोच्या बीपीओत काम करत होती. 1 नोव्हेंबर 2007 रोजी ती नाईट शिफ्टसाठी जात होती त्यावेळी ड्रायव्हर बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेनं तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. यानंतर मार्च 2012 ला सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती. तर आता हायकोर्टानंही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2012 03:28 PM IST

ज्योतिकुमारीच्या मारेकर्‍यांना फाशीच

17 सप्टेंबर

पुण्यातल्या ज्योतिकुमारी चौधरी हत्या प्रकरणातल्या दोन आरोपींच्या फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटे या दोघांनी 2007 मध्ये ज्योतिकुमारीचा बलात्कार करुन खून केला होता. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्योतिकुमारी हिंजवडी आयटी पार्कमधल्या विप्रोच्या बीपीओत काम करत होती. 1 नोव्हेंबर 2007 रोजी ती नाईट शिफ्टसाठी जात होती त्यावेळी ड्रायव्हर बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेनं तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. यानंतर मार्च 2012 ला सेशन्स कोर्टाने फाशीची शिक्षा दिली होती. तर आता हायकोर्टानंही या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2012 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close