S M L

एनडीएच्या भारत बंदमध्ये पुणे भाजपचा सहभाग नसणार

19 सप्टेंबरएफडीआय आणि दरवाढीला विरोध करण्यासाठी एनडीएने गुरूवारी भारत बंद पुकारला आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं सामज्यंस्याची भूमिका सर्वच पक्षांनी बंदला फक्त नैतिक पाठिंबा दिला आहे. पुण्यातील भाजपनेच आता बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विकास मठकरी यांनी स्पष्ट केलं. या अगोदर एनडीएतील घटक पक्ष शिवसेनेनंही बंदमध्ये सहभाग होणार नसल्याचं स्पष्ट करुन टाकलं होतं. त्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास स्टाईलला मुरड घालत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबई आणि राज्यात बंदचा फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2012 03:37 PM IST

एनडीएच्या भारत बंदमध्ये पुणे भाजपचा सहभाग नसणार

19 सप्टेंबर

एफडीआय आणि दरवाढीला विरोध करण्यासाठी एनडीएने गुरूवारी भारत बंद पुकारला आहे. महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू असल्यानं सामज्यंस्याची भूमिका सर्वच पक्षांनी बंदला फक्त नैतिक पाठिंबा दिला आहे. पुण्यातील भाजपनेच आता बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विकास मठकरी यांनी स्पष्ट केलं. या अगोदर एनडीएतील घटक पक्ष शिवसेनेनंही बंदमध्ये सहभाग होणार नसल्याचं स्पष्ट करुन टाकलं होतं. त्यापाठोपाठ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास स्टाईलला मुरड घालत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबई आणि राज्यात बंदचा फारसा परिणाम होणार नाही अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2012 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close