S M L

होय, आमच्या टीममध्ये दुफळी पण ध्येय एकच - अण्णा हजारे

18 सप्टेंबरराजकीय पक्ष काढण्यावरुन अरविंद केजरीवाल आणि आपल्यात मतभेद असल्याची स्पष्ट कबुली खुद्द अण्णा हजारे यांनी दिली आहे. आमच्या आंदोलनाचे दोन भाग झाले असले तरी आमचं ध्येय एकच असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या चांगल्या उमेदवारांना आपण पाठिंबा, देणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. जनआंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अण्णांनी आज काही मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक घेतली. बैठकीला अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ उपस्थित होते. राजकीय पक्ष नको, असं या मान्यवरांचं मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 11:30 AM IST

होय, आमच्या टीममध्ये दुफळी पण ध्येय एकच - अण्णा हजारे

18 सप्टेंबर

राजकीय पक्ष काढण्यावरुन अरविंद केजरीवाल आणि आपल्यात मतभेद असल्याची स्पष्ट कबुली खुद्द अण्णा हजारे यांनी दिली आहे. आमच्या आंदोलनाचे दोन भाग झाले असले तरी आमचं ध्येय एकच असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या चांगल्या उमेदवारांना आपण पाठिंबा, देणार असल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. जनआंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अण्णांनी आज काही मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक घेतली. बैठकीला अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ उपस्थित होते. राजकीय पक्ष नको, असं या मान्यवरांचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close