S M L

'निर्णय मागे घ्या अन्यथा पर्यायाची घोषणा करू'

20 सप्टेंबरममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे आता मुलायम सिंग आणि मायावतींवर काँग्रेसची मदार आहे. पण मुलायमसिंगांनीही काँग्रेसला इशारे द्यायला सुरुवात केलीय. रिटेल क्षेत्रातलं एफडीआय मागे घेतलं नाही तर आपला पक्ष नव्या राजकीय पर्यायाची घोषणा करेल, असं मुलायम सिंग यांनी म्हटलं आहे. यापूर्वीच सीपीएमचे नेते प्रकाश करात यांनी मुलायमसिंगांना तिसर्‍या आघाडीचं नेतृत्व करण्याची गळ घातली. तरीही, मुलायम अजूनही काँग्रेसशी फारकत घेत नाही. एकूणच, राजकीय फायद्यांचा विचार करून मुलायम सिंग सावध खेळी करत आहे. केंद्रातली अस्थिर परिस्थिती बघून मुलायम सिंह यादवांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारलाय. तिसर्‍या आघाडीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.मुलायम सिंहांचे डाव्या पक्षांतले मित्र भाजपबरोबर एकाच व्यासपीठावरून थेट परकीय गुंतवणुकीचा विरोध करताना दिसले. मुलायम सिंहांनी भाजपच्या व्यासपीठावर जाणं टाळलं असलं. तरी त्यांच्यासोबत अटक मात्र करवून घेतली. समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव म्हणतात, आम्ही भाजपला कधीच सत्तेवर येऊ देणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी डाव्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे.. आता डावे पक्ष अधिकच आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. डाव्यांनी मुलायम यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला असला तरी समाजवादी पक्षानं अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुदतपूर्व निवडणुकीची वाट मुलायम सिंहही पाहताहेत. त्यामुळेच आता त्यांचं लक्ष लागलंय मायावतींच्या भूमिकेकडे... बहुजन समाज पक्ष सरकारला पाठिंबा देणार की नाही, हे ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात स्पष्ट होऊ शकले. त्यांचा पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे. भाजपनं मात्र तिसरी आघाडी आता इतिहासजमा झाल्याचं म्हटलंय. मुलायम यांनी धाडसी राजकीय वक्तव्य केलंय. थेट परकीय गुंतवणुकीचा विरोध करताना त्यांनी भाजपला स्वत:पासून दूर ठेवलं आणि आपण तिसर्‍या आघाडीचे नेते असल्याचे संकेतही दिले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुजन समाज पक्षाची रणनीती अजून स्पष्ट झालेली नसल्यामुळे त्यांनी यूपीएशी चर्चेची कवाडं उघडी ठेवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2012 10:32 AM IST

'निर्णय मागे घ्या अन्यथा पर्यायाची घोषणा करू'

20 सप्टेंबर

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे आता मुलायम सिंग आणि मायावतींवर काँग्रेसची मदार आहे. पण मुलायमसिंगांनीही काँग्रेसला इशारे द्यायला सुरुवात केलीय. रिटेल क्षेत्रातलं एफडीआय मागे घेतलं नाही तर आपला पक्ष नव्या राजकीय पर्यायाची घोषणा करेल, असं मुलायम सिंग यांनी म्हटलं आहे. यापूर्वीच सीपीएमचे नेते प्रकाश करात यांनी मुलायमसिंगांना तिसर्‍या आघाडीचं नेतृत्व करण्याची गळ घातली. तरीही, मुलायम अजूनही काँग्रेसशी फारकत घेत नाही. एकूणच, राजकीय फायद्यांचा विचार करून मुलायम सिंग सावध खेळी करत आहे. केंद्रातली अस्थिर परिस्थिती बघून मुलायम सिंह यादवांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारलाय. तिसर्‍या आघाडीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.मुलायम सिंहांचे डाव्या पक्षांतले मित्र भाजपबरोबर एकाच व्यासपीठावरून थेट परकीय गुंतवणुकीचा विरोध करताना दिसले. मुलायम सिंहांनी भाजपच्या व्यासपीठावर जाणं टाळलं असलं. तरी त्यांच्यासोबत अटक मात्र करवून घेतली. समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव म्हणतात, आम्ही भाजपला कधीच सत्तेवर येऊ देणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी डाव्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे.. आता डावे पक्ष अधिकच आक्रमकपणे रस्त्यावर उतरले.

डाव्यांनी मुलायम यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला असला तरी समाजवादी पक्षानं अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुदतपूर्व निवडणुकीची वाट मुलायम सिंहही पाहताहेत. त्यामुळेच आता त्यांचं लक्ष लागलंय मायावतींच्या भूमिकेकडे... बहुजन समाज पक्ष सरकारला पाठिंबा देणार की नाही, हे ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात स्पष्ट होऊ शकले. त्यांचा पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.

भाजपनं मात्र तिसरी आघाडी आता इतिहासजमा झाल्याचं म्हटलंय. मुलायम यांनी धाडसी राजकीय वक्तव्य केलंय. थेट परकीय गुंतवणुकीचा विरोध करताना त्यांनी भाजपला स्वत:पासून दूर ठेवलं आणि आपण तिसर्‍या आघाडीचे नेते असल्याचे संकेतही दिले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुजन समाज पक्षाची रणनीती अजून स्पष्ट झालेली नसल्यामुळे त्यांनी यूपीएशी चर्चेची कवाडं उघडी ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close