S M L

एनडीएच्या 'भारत बंद'ला ममतांचा तीव्र विरोध

20 सप्टेंबरभाजप आणि डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला. आम्ही यूपीए च्या विरुद्ध आहोत पण बंदला आमचा पाठिंबा नाही,पश्चिम बंगालमध्ये बंदचा परिणाम नाही आता बंगालमध्ये काम करण्याची संस्कृती आली आहे असा टोला ममतांनी डाव्यांना लगावला. त्याचबरोबर बंद करणार्‍या संघटनांवर कारवाई केली जाईल, असंही त्या म्हणाल्यात. दरम्यान, ममतांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही एफडीआयच्या वादात खेचलंय. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, असं मुखर्जी यांनी 2011 मध्ये संसदेत म्हटलं होतं. त्याची आठवण मुखर्जी यांनी करून दिली. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये एफडीआयची अंमलबजावणी होणार नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. दरम्यान, कोलकातामध्ये बंद दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. तर कूंचबिहार जिल्ह्यात निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2012 08:50 AM IST

एनडीएच्या 'भारत बंद'ला ममतांचा तीव्र विरोध

20 सप्टेंबर

भाजप आणि डाव्यांनी पुकारलेल्या भारत बंदला ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला. आम्ही यूपीए च्या विरुद्ध आहोत पण बंदला आमचा पाठिंबा नाही,पश्चिम बंगालमध्ये बंदचा परिणाम नाही आता बंगालमध्ये काम करण्याची संस्कृती आली आहे असा टोला ममतांनी डाव्यांना लगावला. त्याचबरोबर बंद करणार्‍या संघटनांवर कारवाई केली जाईल, असंही त्या म्हणाल्यात. दरम्यान, ममतांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही एफडीआयच्या वादात खेचलंय. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय थेट परकीय गुंतवणुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, असं मुखर्जी यांनी 2011 मध्ये संसदेत म्हटलं होतं. त्याची आठवण मुखर्जी यांनी करून दिली. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये एफडीआयची अंमलबजावणी होणार नाही, असंही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं.

दरम्यान, कोलकातामध्ये बंद दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. तर कूंचबिहार जिल्ह्यात निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2012 08:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close