S M L

भुजबळांच्या चौकशीला सुरुवात ; FIR चा निर्णय गृहखात्याकडे

18 सप्टेंबरदिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीला 6 सप्टेंबरपासूनच सुरुवात झालीय. अँटी करप्शन ब्युरोचे अपर महासंचालक रामराव वाघ यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना लिहिलेलं पत्र आयबीएन लोकमतच्या हाती आलंय. त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून भुजबळांची चौकशी सहा सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. पण याप्रकरणी भुजबळांविरोधात एफआयआर दाखल करायला मात्र अजून गृहखात्याकडून ग्रीन सिग्नल ऍन्टीकरप्शन ब्युरोला मिळालेला नाही. छगन भुजबळ राज्याचे मंत्री असल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करायचा किंवा नाही याचा प्रस्ताव गृहखात्याकडून तयार केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागणार आहे. याबद्दलचा खुलासा आयबीएन लोकमतने शनिवारी केला होता. दरम्यान, आपण चौकशीला सर्व सहकार्य करू त्यातून सत्य बाहेर येईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 01:49 PM IST

भुजबळांच्या चौकशीला सुरुवात ; FIR चा निर्णय गृहखात्याकडे

18 सप्टेंबर

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीला 6 सप्टेंबरपासूनच सुरुवात झालीय. अँटी करप्शन ब्युरोचे अपर महासंचालक रामराव वाघ यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांना लिहिलेलं पत्र आयबीएन लोकमतच्या हाती आलंय. त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून भुजबळांची चौकशी सहा सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. पण याप्रकरणी भुजबळांविरोधात एफआयआर दाखल करायला मात्र अजून गृहखात्याकडून ग्रीन सिग्नल ऍन्टीकरप्शन ब्युरोला मिळालेला नाही. छगन भुजबळ राज्याचे मंत्री असल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करायचा किंवा नाही याचा प्रस्ताव गृहखात्याकडून तयार केला जाईल त्यानंतर मुख्यमंत्र्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागणार आहे. याबद्दलचा खुलासा आयबीएन लोकमतने शनिवारी केला होता. दरम्यान, आपण चौकशीला सर्व सहकार्य करू त्यातून सत्य बाहेर येईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close