S M L

'देऊळ' ऑस्करला जाणार ?

18 सप्टेंबरऑस्करसाठी भारतातून दर वर्षी सिनेमे पाठवले जातात. भाषिक चित्रपटांमध्ये देऊळ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे. ऑस्कर या सर्वोच्च समजल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी भारतातून सिनेमे पाठवले जातात. मराठी सिनेमांंमध्ये श्वास आणि नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी ऑस्करसाठी पाठवले गेले. आणि आता शक्यता आहे ती देऊळची. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ देवाच्या नावे चाललेल्या बाजारावर भाष्य करतो. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर , गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयानं देऊळ एका वेगळ्या उंचीवर पोचलाय. देऊळमधून एक वेगळं तत्त्वज्ञान मांडलं गेलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा स्वीकार होऊही शकतो. भारतातून जाणार्‍या हिंदी सिनेमांमध्येही अंतिम यादीत 9 सिनेमांची निवड झालीय. त्यातून एक ऑस्करसाठी जाईल. त्यात देऊळ असण्याची शक्यता जास्त आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2012 05:04 PM IST

'देऊळ' ऑस्करला जाणार ?

18 सप्टेंबर

ऑस्करसाठी भारतातून दर वर्षी सिनेमे पाठवले जातात. भाषिक चित्रपटांमध्ये देऊळ ऑस्करला जाण्याची शक्यता आहे. ऑस्कर या सर्वोच्च समजल्या जाणार्‍या पुरस्कारासाठी भारतातून सिनेमे पाठवले जातात. मराठी सिनेमांंमध्ये श्वास आणि नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी ऑस्करसाठी पाठवले गेले. आणि आता शक्यता आहे ती देऊळची. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ देवाच्या नावे चाललेल्या बाजारावर भाष्य करतो. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर , गिरीश कुलकर्णी यांच्या अभिनयानं देऊळ एका वेगळ्या उंचीवर पोचलाय. देऊळमधून एक वेगळं तत्त्वज्ञान मांडलं गेलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा स्वीकार होऊही शकतो. भारतातून जाणार्‍या हिंदी सिनेमांमध्येही अंतिम यादीत 9 सिनेमांची निवड झालीय. त्यातून एक ऑस्करसाठी जाईल. त्यात देऊळ असण्याची शक्यता जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2012 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close