S M L

यूपीएचा मार्ग 'मुलायम'

21 सप्टेंबरतृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढल्यानंतर केंद्र सरकार संकटात सापडलं होतं. मात्र आता यूपीएवरचं संकट टळलंय. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. समाजवादी पार्टीचे 22 खासदार आहेत. त्यामुळे सध्यातरी यूपीए सरकारवरचं संकट टळल्याचं दिसतंय. पण एफडीआयला विरोध कायम ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढची निवडणूक तिसरी आघाडी जिंकेल असा विश्वासही मुलायम सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. मुलायम सिंग यांनी केंद्र सरकारला पाठिंबा कायम ठेवण्याची घोषणा केली. आणि त्याचे पडसाद थेट शेअर मार्केटमध्ये उमटले. सेंसेक्स 400 अंकांनी वधरले तर निफ्टी 145 अंकांनी वधारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2012 09:42 AM IST

यूपीएचा मार्ग 'मुलायम'

21 सप्टेंबर

तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा काढल्यानंतर केंद्र सरकार संकटात सापडलं होतं. मात्र आता यूपीएवरचं संकट टळलंय. सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केंद्र सरकारला बाहेरुन पाठिंबा कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. समाजवादी पार्टीचे 22 खासदार आहेत. त्यामुळे सध्यातरी यूपीए सरकारवरचं संकट टळल्याचं दिसतंय. पण एफडीआयला विरोध कायम ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढची निवडणूक तिसरी आघाडी जिंकेल असा विश्वासही मुलायम सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. मुलायम सिंग यांनी केंद्र सरकारला पाठिंबा कायम ठेवण्याची घोषणा केली. आणि त्याचे पडसाद थेट शेअर मार्केटमध्ये उमटले. सेंसेक्स 400 अंकांनी वधरले तर निफ्टी 145 अंकांनी वधारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2012 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close