S M L

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ

24 सप्टेंबरगणेशोत्सव सुरू असताना आणि दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचार्‍यांना खूशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ होणार आहे. हा भत्ता 1 जूलै 2012 पासून लागू होणार आहे. याचा फायदा 80 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने अलीकडेच डिझेलच्या दरात वाढ केली आणि एलपीजी सिलेंडरवर मर्यादा घातली आहे. त्यामुळे अगोदरच महागाईने होरपळलेल्या जनतेचं कंबरडं मोडलं गेलंय. जुलै महिन्यात पेट्रोलच्या किंमती वाढ करण्यात आली होती. पण ही दरवाढ अपरिहार्य असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2012 02:31 PM IST

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ

24 सप्टेंबर

गणेशोत्सव सुरू असताना आणि दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचार्‍यांना खूशखबर दिली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ होणार आहे. हा भत्ता 1 जूलै 2012 पासून लागू होणार आहे. याचा फायदा 80 लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने अलीकडेच डिझेलच्या दरात वाढ केली आणि एलपीजी सिलेंडरवर मर्यादा घातली आहे. त्यामुळे अगोदरच महागाईने होरपळलेल्या जनतेचं कंबरडं मोडलं गेलंय. जुलै महिन्यात पेट्रोलच्या किंमती वाढ करण्यात आली होती. पण ही दरवाढ अपरिहार्य असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2012 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close