S M L

रिकाम्या खुर्च्या टी-20 वर्ल्डकपला साक्षीदार !

22 सप्टेंबररिकामी स्टेडियम्स, दुबळ्या टीम्सच्या मॅच आणि ठरलेले निकाल यामुळे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक बनवण्यात मोठी चूक केली. की क्रिकेट फॅन्स फक्त मोठ्या मॅचेस सुरु होण्याची वाट बघतायत हाच खरा प्रश्न आहे. टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झालीये पण हे दृष्य खटकणारं आहे. कारण पहिल्या काही मॅच या रिक्याम्या स्टँड्ससमोर खेळवाव्या लागल्यात. वर्ल्ड कपचं प्रमोशन जरी मोठं केलं.असलं तरीही प्रेक्षकांनी मात्र वर्ल्ड कपकडे पाठ फिरवली आहे. रिकाम्या स्टँड्ससाठी काही जण वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाला दोष देत आहे. कारण वर्ल्ड कपची सुरुवातच काही सोप्या मॅचेसनं झाली. पहिल्या चार दिवसांमध्ये प्रत्येक मॅचमध्ये एक दुबळी टीम होती. त्याचबरोबर एकही मोठी मॅच सुरुवातीला खेळवण्यात आली नाही. सुपर एटच्या मॅच जेव्हा सुरु होतील तेव्हा टीव्ही रेटिंग्ज आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल यात शंका नाही. पण हा प्रतिसाद किती वाढेल याबाबत नक्कीच शंका आहे. त्यामुळे याही वर्ल्ड कपला खराब वेळापत्रकाचा फटका बसणार असचं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2012 02:03 PM IST

रिकाम्या खुर्च्या टी-20 वर्ल्डकपला साक्षीदार !

22 सप्टेंबर

रिकामी स्टेडियम्स, दुबळ्या टीम्सच्या मॅच आणि ठरलेले निकाल यामुळे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवातीलाच धक्का बसला आहे. आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक बनवण्यात मोठी चूक केली. की क्रिकेट फॅन्स फक्त मोठ्या मॅचेस सुरु होण्याची वाट बघतायत हाच खरा प्रश्न आहे.

टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झालीये पण हे दृष्य खटकणारं आहे. कारण पहिल्या काही मॅच या रिक्याम्या स्टँड्ससमोर खेळवाव्या लागल्यात. वर्ल्ड कपचं प्रमोशन जरी मोठं केलं.असलं तरीही प्रेक्षकांनी मात्र वर्ल्ड कपकडे पाठ फिरवली आहे. रिकाम्या स्टँड्ससाठी काही जण वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाला दोष देत आहे. कारण वर्ल्ड कपची सुरुवातच काही सोप्या मॅचेसनं झाली.

पहिल्या चार दिवसांमध्ये प्रत्येक मॅचमध्ये एक दुबळी टीम होती. त्याचबरोबर एकही मोठी मॅच सुरुवातीला खेळवण्यात आली नाही. सुपर एटच्या मॅच जेव्हा सुरु होतील तेव्हा टीव्ही रेटिंग्ज आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल यात शंका नाही. पण हा प्रतिसाद किती वाढेल याबाबत नक्कीच शंका आहे. त्यामुळे याही वर्ल्ड कपला खराब वेळापत्रकाचा फटका बसणार असचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close