S M L

विजय पांढरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न

22 सप्टेंबरराज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या तांत्रिक चौकशीची मागणी करणार्‍या मेरीचे चीफ इंजिअर विजय पांढरे यांच्यावर आता दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. शासकीय अभियंता महासंघाची औरंगाबादमध्ये नुकतीच बैठक झाली. त्यात पाढंरे यांचे वर्तन बेशिस्त असल्याची चर्चा झाली. यात पांढरे यांच्या हेतुविषयीही शंका घेण्यात आली आहे. पुढारी आणि ठेकेदारांच्या दबावामुळे राज्यातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये तब्बल 35 हजार कोटींचा अनाठायी खर्च झाल्याचं पत्र मेरीचे चीफ इंजिनिअर विजय पांढरे यांनी सरकारला पाठवले होते. राज्यातल्या सर्व सिंचन महामंडळांच्या सर्व अंदाजपत्रकांची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने त्याची दखलही घेतली होती. दरम्यान, पांढरे यांच्याबद्दल कलुषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संघटनांच्या माध्यमातून सुरू झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2012 02:20 PM IST

विजय पांढरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न

22 सप्टेंबर

राज्यातल्या सिंचन प्रकल्पांच्या तांत्रिक चौकशीची मागणी करणार्‍या मेरीचे चीफ इंजिअर विजय पांढरे यांच्यावर आता दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. शासकीय अभियंता महासंघाची औरंगाबादमध्ये नुकतीच बैठक झाली. त्यात पाढंरे यांचे वर्तन बेशिस्त असल्याची चर्चा झाली. यात पांढरे यांच्या हेतुविषयीही शंका घेण्यात आली आहे. पुढारी आणि ठेकेदारांच्या दबावामुळे राज्यातल्या सिंचन प्रकल्पांमध्ये तब्बल 35 हजार कोटींचा अनाठायी खर्च झाल्याचं पत्र मेरीचे चीफ इंजिनिअर विजय पांढरे यांनी सरकारला पाठवले होते. राज्यातल्या सर्व सिंचन महामंडळांच्या सर्व अंदाजपत्रकांची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने त्याची दखलही घेतली होती. दरम्यान, पांढरे यांच्याबद्दल कलुषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संघटनांच्या माध्यमातून सुरू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close