S M L

यूपीएच्या बैठकीत घटक पक्षांचे नाराजीचे सूर

27 सप्टेंबरममता बॅनर्जी यांनी यूपीएला रामराम केल्यानंतर आज पहिल्यांदा यूपीएच्या समन्वय समितीची बैठक झाली. पण या बैठकीत यूपीएच्या घटकपक्षांमध्ये असलेले मतभेदच उघड झाले. घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर सरकारनं जी मर्यादा घातलीय ती वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी केली. तर डिझेल दरवाढही मागे घेण्याची मागणी द्रमुकनं केली आहे. या दरवाढीमुळे निवडणूक जिंकणं अवघड होईल अशी भीती या मित्रपक्षांनी व्यक्त केली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि अर्थमंत्री मात्र निर्णयांवर ठाम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 04:34 PM IST

यूपीएच्या बैठकीत घटक पक्षांचे नाराजीचे सूर

27 सप्टेंबर

ममता बॅनर्जी यांनी यूपीएला रामराम केल्यानंतर आज पहिल्यांदा यूपीएच्या समन्वय समितीची बैठक झाली. पण या बैठकीत यूपीएच्या घटकपक्षांमध्ये असलेले मतभेदच उघड झाले. घरगुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीवर सरकारनं जी मर्यादा घातलीय ती वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकच्या नेत्यांनी केली. तर डिझेल दरवाढही मागे घेण्याची मागणी द्रमुकनं केली आहे. या दरवाढीमुळे निवडणूक जिंकणं अवघड होईल अशी भीती या मित्रपक्षांनी व्यक्त केली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि अर्थमंत्री मात्र निर्णयांवर ठाम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 04:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close