S M L

बुलडाण्यात एसटी बस नदीत कोसळून 19 ठार

26 सप्टेंबरबुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एसटी बस नदीत कोसळल्यानं 19 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. संग्रामपूर-शेगाव ही बस पूर्णा नदीच्या पात्रात 60 फूट उंचीवरुन कोसळली. ही बस शेगावरुन पाथुर्डे येथे जात असताना खिरोडा येथील पुलावर हा अपघात घडला. या अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर कंडक्टरला वाचवण्यात यश आलंय. या बसमध्ये जवळपास 36 प्रवासी होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात एका दीड वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलंय. दरम्यान, या पुलाला कठडे नसल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी इथल्या गावकर्‍यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2012 01:11 PM IST

बुलडाण्यात एसटी बस नदीत कोसळून 19 ठार

26 सप्टेंबर

बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास एसटी बस नदीत कोसळल्यानं 19 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 15 प्रवासी जखमी झाले आहे. संग्रामपूर-शेगाव ही बस पूर्णा नदीच्या पात्रात 60 फूट उंचीवरुन कोसळली. ही बस शेगावरुन पाथुर्डे येथे जात असताना खिरोडा येथील पुलावर हा अपघात घडला. या अपघातात ड्रायव्हरचा मृत्यू झाला. तर कंडक्टरला वाचवण्यात यश आलंय. या बसमध्ये जवळपास 36 प्रवासी होते. त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात एका दीड वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलंय. दरम्यान, या पुलाला कठडे नसल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येतं आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी इथल्या गावकर्‍यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2012 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close