S M L

अजित पवारांच्या राजीनाम्यावर फेरविचार नाही -शरद पवार

27 सप्टेंबरअजित पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत अजित पवारांनी राजीनामा दिला आहे यावर आता कोणतीच चर्चा होणार नाही असं विधान केल्यानं राष्ट्रवादीत पुन्हा संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. शरद पवार उद्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यात ते सर्व आमदारांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. आधीच विधामंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव झाल्याप्रमाणे अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांही राजीनामे देऊन टाकले आहे. मात्र शरद पवारांनी काल कोलकात्यात मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शनामुळे शरद पवार नाराजदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या निदर्शनांवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मधुकर पिचड यांनी दिली. तसंच कोणीही मुख्यमंत्री किंवा काँग्रेसविरोधात निदर्शनं करु नयेत अशा सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज कोल्हापूरमध्ये होते. राजीनाम्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच मुंबईबाहेर गेले आहेत. यावेळी त्यांनी कुठल्याही सरकारी वाहनाचा वापर केला नाही तसेच ते सरकारी रेस्ट हाऊ समध्येही थांबले नाहीत. एअरपोर्टरवर त्यांनी पोलिसांची मानवंदनाही नाकारली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 10:55 AM IST

अजित पवारांच्या राजीनाम्यावर फेरविचार नाही -शरद पवार

27 सप्टेंबर

अजित पवारांच्या राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत अजित पवारांनी राजीनामा दिला आहे यावर आता कोणतीच चर्चा होणार नाही असं विधान केल्यानं राष्ट्रवादीत पुन्हा संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. शरद पवार उद्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यात ते सर्व आमदारांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. आधीच विधामंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव झाल्याप्रमाणे अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांही राजीनामे देऊन टाकले आहे. मात्र शरद पवारांनी काल कोलकात्यात मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निदर्शनामुळे शरद पवार नाराज

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या निदर्शनांवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मधुकर पिचड यांनी दिली. तसंच कोणीही मुख्यमंत्री किंवा काँग्रेसविरोधात निदर्शनं करु नयेत अशा सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज कोल्हापूरमध्ये होते. राजीनाम्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच मुंबईबाहेर गेले आहेत. यावेळी त्यांनी कुठल्याही सरकारी वाहनाचा वापर केला नाही तसेच ते सरकारी रेस्ट हाऊ समध्येही थांबले नाहीत. एअरपोर्टरवर त्यांनी पोलिसांची मानवंदनाही नाकारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close