S M L

बाळासाहेबांच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर

01 ऑक्टोबरउद्धव ठाकरे यांच्या ऍजिओप्लास्टीनंतर आज पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मातोश्री'च्या पायर्‍या चढले. निमित्त होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं. पण या चर्चेमध्ये फक्त बाळासाहेब आणि राजचं नव्हते तर उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तब्बल एक तास 42 मिनीटं हि चर्चा झाली. शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ऍजिओप्लास्टीच्यावेळी राज ठाकरे मातोश्रीच्या पायर्‍या चढले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते मातोश्रीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. गेल्या काही काळात राज आणि उद्धव यांनी एकमेंकाची उणीधुणी काढणंही बंद केलंय. राज ठाकरे मातोश्रीवर गेल्यानंतर राजकीय मनोमिलनाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा रंगू लागल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 09:32 AM IST

बाळासाहेबांच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवर

01 ऑक्टोबर

उद्धव ठाकरे यांच्या ऍजिओप्लास्टीनंतर आज पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मातोश्री'च्या पायर्‍या चढले. निमित्त होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं. पण या चर्चेमध्ये फक्त बाळासाहेब आणि राजचं नव्हते तर उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तब्बल एक तास 42 मिनीटं हि चर्चा झाली. शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ऍजिओप्लास्टीच्यावेळी राज ठाकरे मातोश्रीच्या पायर्‍या चढले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते मातोश्रीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. गेल्या काही काळात राज आणि उद्धव यांनी एकमेंकाची उणीधुणी काढणंही बंद केलंय. राज ठाकरे मातोश्रीवर गेल्यानंतर राजकीय मनोमिलनाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा रंगू लागल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close