S M L

कोथरुडमध्ये गुंडांचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

04 ऑक्टोबरपुण्यातल्या कोथरुड भागात किस्तिंधा नगरमध्ये मध्यरात्री 13 ते 14 गाड्यांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी राम केदारी आणि बापू शिरसाठ या सराईत गुन्हेगारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही तोडफोड दहशत माजवण्यासाठी केल्याची माहिती आता समोर येतेय. यावेळी काही घरांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत दोनजण जखमी झाले आहे. या हल्ल्यात एक टू व्हीलर जाळण्यात आली आहे तर 14 दुचाकी वाहनं तोडण्यात आली आणि चार फोर व्हिलर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 07:32 AM IST

कोथरुडमध्ये गुंडांचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

04 ऑक्टोबर

पुण्यातल्या कोथरुड भागात किस्तिंधा नगरमध्ये मध्यरात्री 13 ते 14 गाड्यांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी राम केदारी आणि बापू शिरसाठ या सराईत गुन्हेगारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही तोडफोड दहशत माजवण्यासाठी केल्याची माहिती आता समोर येतेय. यावेळी काही घरांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत दोनजण जखमी झाले आहे. या हल्ल्यात एक टू व्हीलर जाळण्यात आली आहे तर 14 दुचाकी वाहनं तोडण्यात आली आणि चार फोर व्हिलर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 07:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close