S M L

यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु -हर्षवर्धन पाटील

03 ऑक्टोबरपाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी ऊस जळून जाईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळेच यंदाचा गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबर ऐवजी 15 ऑक्टोबरलाच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. नुकतीच पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखरेचं एकूण उत्पादन 40 टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अर्थात यंदाची परिस्थिती तुलनेनं बरी आहे. पुढच्या वर्षी उसाची लागवड अतिशय कमी झालेली असल्याने साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . जवळपास 10 टक्केच लागवड होण्याची शक्यता असल्याने साखर उद्योग चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भातच पुढीच्या महिन्यातल्या बैठकीत निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 11:07 AM IST

यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु -हर्षवर्धन पाटील

03 ऑक्टोबर

पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी ऊस जळून जाईल अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळेच यंदाचा गाळप हंगाम हा 1 नोव्हेंबर ऐवजी 15 ऑक्टोबरलाच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. नुकतीच पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखरेचं एकूण उत्पादन 40 टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अर्थात यंदाची परिस्थिती तुलनेनं बरी आहे. पुढच्या वर्षी उसाची लागवड अतिशय कमी झालेली असल्याने साखर उद्योगच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . जवळपास 10 टक्केच लागवड होण्याची शक्यता असल्याने साखर उद्योग चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भातच पुढीच्या महिन्यातल्या बैठकीत निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close