S M L

मासिक पाळीमुळे महिलांवर काम बंदी

04 ऑक्टोबरछत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्हात त्यांच्याच विचारांना तिलांजली देण्याचा धक्कादायक आणि शर्मेचा प्रकार घडला आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात लाडूंचा प्रसाद वाटला जातो. पण संध्या हा लाडूंचा प्रसाद बंद करुन पेढ्यांचा प्रसाद सुरु करण्यात आला आहे. लाडूंच्या प्रसादांचं कंत्राट महिलांना दिलं जायचं. पण मासिक पाळीमुळे प्रसादाचं पावित्र्या राहणार नाही. त्यामुळे बचत गटाचे कंत्राट ताबडतोब रद्द करावे अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे पत्रक मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय राजाराम पोवार यांनी काढलं होतं. पण वाढत्याविरोधानंतर मनसेला हे पत्रक मागे घ्यावं लागलं. विशेष म्हणजे मागिल वर्षी मनसेचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देण्यात यावा यासाठी आंदोलन केलं होतं. आणि आता जिल्हाध्यक्षच महिलांच्या कामावर गद्दा आणत आहे. मनसेच्या या गोंधळानंतर कंत्राटावर कुठलीच भूमिका न घेता, महालक्ष्मी देवस्थान समितीने लाडूचा प्रसादच न देण्याचं ठरवलं. त्यामुळं देवस्थाननं बोटचेपी भूमिका घेतल्याची टीका होतेय. पुरोगामी महाराष्ट्रात असला प्रकार घडल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 12:01 PM IST

मासिक पाळीमुळे महिलांवर काम बंदी

04 ऑक्टोबर

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्हात त्यांच्याच विचारांना तिलांजली देण्याचा धक्कादायक आणि शर्मेचा प्रकार घडला आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात लाडूंचा प्रसाद वाटला जातो. पण संध्या हा लाडूंचा प्रसाद बंद करुन पेढ्यांचा प्रसाद सुरु करण्यात आला आहे. लाडूंच्या प्रसादांचं कंत्राट महिलांना दिलं जायचं. पण मासिक पाळीमुळे प्रसादाचं पावित्र्या राहणार नाही. त्यामुळे बचत गटाचे कंत्राट ताबडतोब रद्द करावे अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे पत्रक मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय राजाराम पोवार यांनी काढलं होतं. पण वाढत्याविरोधानंतर मनसेला हे पत्रक मागे घ्यावं लागलं. विशेष म्हणजे मागिल वर्षी मनसेचे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देण्यात यावा यासाठी आंदोलन केलं होतं. आणि आता जिल्हाध्यक्षच महिलांच्या कामावर गद्दा आणत आहे. मनसेच्या या गोंधळानंतर कंत्राटावर कुठलीच भूमिका न घेता, महालक्ष्मी देवस्थान समितीने लाडूचा प्रसादच न देण्याचं ठरवलं. त्यामुळं देवस्थाननं बोटचेपी भूमिका घेतल्याची टीका होतेय. पुरोगामी महाराष्ट्रात असला प्रकार घडल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close