S M L

शुमाकरचा पुन्हा एकदा अलविदा

04 ऑक्टोबरफॉर्म्युला वनचा बादशहा मायकल शुमाकर पुन्हा एकदा निवृत्त होणार आहे. 43 वर्षाच्या जर्मन सुपरस्टारने याअगोदरही निवृत्ती घेतली होती पण 2010 मध्ये त्यानं कमबॅकही केलं होतं. पण आता तो पुन्हा एकदा निवृत्ती घेतोय. मायकल शुमाकरनं मर्सेडीस टीमकडून कमबॅक केलं होतं. पण गेल्या 3 सीझनमध्ये त्याला फक्त एकदाच पोडियम फिनीश करता आलंय. शुमाकरनं आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये एकूण 19 सीझनमध्ये 91 रेस जिंकल्यात. पण आता मर्सेडीस टीमनं शुमाकर ऐवजी ल्यूईस हॅमिल्टनशी करार केला. त्यामुळे शुमाकरनं हा निर्णय घेतला. शुमाकर यांनतर सॉबर टीमकडून रेस करणार असल्याचीही चर्चा होती. पण आता शुमाकरनं निवृत्तीची घोषणा केल्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2012 01:22 PM IST

शुमाकरचा पुन्हा एकदा अलविदा

04 ऑक्टोबर

फॉर्म्युला वनचा बादशहा मायकल शुमाकर पुन्हा एकदा निवृत्त होणार आहे. 43 वर्षाच्या जर्मन सुपरस्टारने याअगोदरही निवृत्ती घेतली होती पण 2010 मध्ये त्यानं कमबॅकही केलं होतं. पण आता तो पुन्हा एकदा निवृत्ती घेतोय. मायकल शुमाकरनं मर्सेडीस टीमकडून कमबॅक केलं होतं. पण गेल्या 3 सीझनमध्ये त्याला फक्त एकदाच पोडियम फिनीश करता आलंय. शुमाकरनं आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये एकूण 19 सीझनमध्ये 91 रेस जिंकल्यात. पण आता मर्सेडीस टीमनं शुमाकर ऐवजी ल्यूईस हॅमिल्टनशी करार केला. त्यामुळे शुमाकरनं हा निर्णय घेतला. शुमाकर यांनतर सॉबर टीमकडून रेस करणार असल्याचीही चर्चा होती. पण आता शुमाकरनं निवृत्तीची घोषणा केल्यानं या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2012 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close