S M L

कोल्हापुरात पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला

10 ऑक्टोबरकोल्हापूर शहरात काल मंगळवारी रात्री एका पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला झालाय. सुनिल ठोंबरे असं या पोलिसाचं नाव असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झालीय. गोखले कॉलेज चौकात काल रात्री दहाच्या सुमाराला ठोंबरे यांनी हुल्लडबाजी करणार्‍या काही तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी ठोंबरे यांच्यावरच हल्ला केला. यामुळे संतापलेल्या लोकांनी हल्लेखोरांची वाहनं जाळली. पोलिसांनी श्रीधर जाधव आणि अजित नाईक या हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. जवाहरनगर परिसरातल्या आर.सी गँगचे हे तरूण असल्याचा संशय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2012 02:27 PM IST

कोल्हापुरात पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला

10 ऑक्टोबर

कोल्हापूर शहरात काल मंगळवारी रात्री एका पोलीस कॉन्स्टेबलवर चाकूहल्ला झालाय. सुनिल ठोंबरे असं या पोलिसाचं नाव असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झालीय. गोखले कॉलेज चौकात काल रात्री दहाच्या सुमाराला ठोंबरे यांनी हुल्लडबाजी करणार्‍या काही तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी ठोंबरे यांच्यावरच हल्ला केला. यामुळे संतापलेल्या लोकांनी हल्लेखोरांची वाहनं जाळली. पोलिसांनी श्रीधर जाधव आणि अजित नाईक या हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. जवाहरनगर परिसरातल्या आर.सी गँगचे हे तरूण असल्याचा संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close