S M L

टीम इंडियाचं चुकलं तरी काय ?

03 ऑक्टोबर5 पैकी 4 मॅच जिंकल्यानंतरही टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता धरावा लागलाय ही एक धक्कादायक गोष्ट आहे. कारण सलग तिसर्‍या वेळी भारतीय टीम टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठण्यात अपयशी ठरली आहे. आणि त्यामुळेच आता काही कठीण प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या स्वप्नात इतके दिवस सगळे रमले होते ते स्वप्न पुन्हा एखदा भंगलं. आणि यावेळी अश्रू आवरणंही कठीण जात होतं. टीम इंडियानं शेवटची मॅच जिंकली असली तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आणि टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर एट गटातून तिसर्‍यांदा बाहेर पडण्याची नामुष्कीही ओढावली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला फक्त विजयाची गरज नव्हती तर मोठ्या विजयी गरज होती. पण तरीही भारतीय कॅप्टननं काही भुवया उंचावणारे निर्णय घेतले. भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये एकही बदल झाला नाही. त्याच्या प्रमुख बॉलर्सनाही त्यानं बर्‍याच उशीरानं बॉल हातात दिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कामचलाऊ बॉलर्सना त्यानं पहिली संधी दिली.पण टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप इतकाही वाईट गेला नाही. स्पर्धेतल्या पाचपैकी चार मॅचमध्ये टीमनं विजय मिळवला. तर चार मॅचमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी ऑलआऊटही केलं होतं. तर आपल्या सर्वात तुफान ऑलराऊंडरचं टीमनं स्वागतंही केलंय. कारण शेवटच्या मॅचमध्ये युवराज सिंगनं मॅन ऑफ द मॅचचा खिताबही पटकावला. भारतीय टीमकडे गमवण्यासारखं काहीच उरलेलं नाही. पण आत्मपरिक्षण करण्यासाठी त्यांना आता वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढील महत्वाच्या दौर्‍यांअगोदर टीम इंडिया आपले कच्चे दुवे सुधारते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. भारतीय टीमचे प्रमुख बॅट्समन वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम एस धोणी या स्पर्धेत सपशेल फ्लॉप ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 01:45 PM IST

टीम इंडियाचं चुकलं तरी काय ?

03 ऑक्टोबर

5 पैकी 4 मॅच जिंकल्यानंतरही टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता धरावा लागलाय ही एक धक्कादायक गोष्ट आहे. कारण सलग तिसर्‍या वेळी भारतीय टीम टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठण्यात अपयशी ठरली आहे. आणि त्यामुळेच आता काही कठीण प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्या स्वप्नात इतके दिवस सगळे रमले होते ते स्वप्न पुन्हा एखदा भंगलं. आणि यावेळी अश्रू आवरणंही कठीण जात होतं. टीम इंडियानं शेवटची मॅच जिंकली असली तरीही स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं होतं. आणि टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर एट गटातून तिसर्‍यांदा बाहेर पडण्याची नामुष्कीही ओढावली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला फक्त विजयाची गरज नव्हती तर मोठ्या विजयी गरज होती. पण तरीही भारतीय कॅप्टननं काही भुवया उंचावणारे निर्णय घेतले. भारतीय बॅटिंग ऑर्डरमध्ये एकही बदल झाला नाही. त्याच्या प्रमुख बॉलर्सनाही त्यानं बर्‍याच उशीरानं बॉल हातात दिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कामचलाऊ बॉलर्सना त्यानं पहिली संधी दिली.

पण टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप इतकाही वाईट गेला नाही. स्पर्धेतल्या पाचपैकी चार मॅचमध्ये टीमनं विजय मिळवला. तर चार मॅचमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी ऑलआऊटही केलं होतं. तर आपल्या सर्वात तुफान ऑलराऊंडरचं टीमनं स्वागतंही केलंय. कारण शेवटच्या मॅचमध्ये युवराज सिंगनं मॅन ऑफ द मॅचचा खिताबही पटकावला.

भारतीय टीमकडे गमवण्यासारखं काहीच उरलेलं नाही. पण आत्मपरिक्षण करण्यासाठी त्यांना आता वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढील महत्वाच्या दौर्‍यांअगोदर टीम इंडिया आपले कच्चे दुवे सुधारते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

भारतीय टीमचे प्रमुख बॅट्समन वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम एस धोणी या स्पर्धेत सपशेल फ्लॉप ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close