S M L

रॉबर्ट वडरांनी केला जमीन खरेदी गैरव्यवहार ?

परिक्षीत लुथरा, मेवात, हरियाणा10 ऑक्टोबरसोनियांचे जावई रॉबर्ट वडरा यांनी हरियाणात घेतलेल्या जमिनीसंबंधीचे आणखी काही पुरावे आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहे. डीएलएफ कंपनीशी केलेल्या कराराव्यतिरिक्त वडरा यांनी हरियाणातल्या मेवातमधल्या भूखंडांमध्येही मोठी गुंतवणूक केलीय. हे भूखंड वडरा यांनी शेतकर्‍यांकडून थेट खरेदी केले. या व्यवहारातही अनेक गैरप्रकार झाले आहे. वडरांच्या रिअल अर्थ इस्टेट लिमिटेड या कंपनीनं हा व्यवहार केला. पण ही 27 एकर जमीन वडरांनी बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीला विकत घेतली. या व्यवहाराचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आता विरोधकांनी केलीय.हरियाणाची राजधानी चंदिगडपासून काही किलोमीटर अंतरावर आहे मेवात.गेल्या काही वर्षात या भागातल्या जमिनीला मोठी मागणी आलीय. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांनाही या जमिनीत रस आहे. त्यांनी इथल्या जमिनी थेट शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या आहेत. आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार वडरा यांनी 2009 साली मेवातच्या आसपास दोन लाख साठ हजार रुपये प्रति एकरच्या दरानं जमीन खरेदी केली. मेसर्स रिअल अर्थ इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ही खरेदी केलीय आणि या कंपनीचे संचालक आहेत रॉबर्ट वडरा... विशेष म्हणजे मेवातच्या आसपासच्या भूखंडाची कलेक्टर ऑफिसनं काढलेली किंमत आहे तब्बल 16 लाख रुपये प्रति एकर पण वडरा यांनी..रूबी तबस्सूम यांच्याकडून 2 एकर भूखंड 7 लाखांनाआनंद डच फूड इंडिया लिमिटेडकडून 8 एकर भूखंड 20 लाख रुपयांनामेमूनाकडून 2 एकर भूखंड 7 लाख रुपयांनारझियाकडून 2 एकर भूखंड 7 लाख रुपयांनासुभाष चंद यांच्याकडून 2 एकर भूखंड 6 लाख रुपयांना आणिफिरदोस बेगम यांच्याकडून 11 एकर भूखंड 24 लाख रुपयांना खरेदी केलाम्हणजे वडरा यांनी जवळपास 2 लाख 60 हजार रुपये प्रति एकर या दरानं भूखंड खरेदी केले. पण त्यांच्या कंपनीनं या भूखंडासाठी स्टॅम्प ड्युटी मात्र कलेक्टर ऑफिसच्या दरानुसार भरलीय. राजकीय पक्षांनीही आता या खरेदीवर प्रश्न उपस्थित केलेत. हे भूखंड स्थानिक काँग्रेस नेते आफताब अहमद यांच्या कुटुंबीयांकडून घेण्यात आल्याचं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं म्हणणंय. ज्या वेळी हा खरेदी व्यवहार झाला त्याच काळात आफताब अहमद यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. इंडियन नॅशनल लोक दलाचे स्थानिक आमदार नसीम अहमद यांनीही वडरा आणि हरियाणा सरकारवर टीका केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून इथे जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पण या जमिनींच्या व्यवहारात हितसंबंध गुंतले असल्याचा त्यांचाही आरोप आहे. पण ग्रामस्थांचं म्हणणं काही वेगळंच आहे. कलेक्टर ऑफिसनं ठरवलेल्या दरापेक्षा कमी दरानं जमिनी विकणं, ही नित्याचीच बाब असल्याचं गावकरी सांगतात.शेतकर्‍यांनी जरी जमिनी योग्य दरातच विकल्याचा दावा केला असला तरी विरोधकांनी मात्र या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2012 04:46 PM IST

रॉबर्ट वडरांनी केला जमीन खरेदी गैरव्यवहार ?

परिक्षीत लुथरा, मेवात, हरियाणा

10 ऑक्टोबर

सोनियांचे जावई रॉबर्ट वडरा यांनी हरियाणात घेतलेल्या जमिनीसंबंधीचे आणखी काही पुरावे आयबीएन नेटवर्कच्या हाती लागले आहे. डीएलएफ कंपनीशी केलेल्या कराराव्यतिरिक्त वडरा यांनी हरियाणातल्या मेवातमधल्या भूखंडांमध्येही मोठी गुंतवणूक केलीय. हे भूखंड वडरा यांनी शेतकर्‍यांकडून थेट खरेदी केले. या व्यवहारातही अनेक गैरप्रकार झाले आहे. वडरांच्या रिअल अर्थ इस्टेट लिमिटेड या कंपनीनं हा व्यवहार केला. पण ही 27 एकर जमीन वडरांनी बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीला विकत घेतली. या व्यवहाराचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आता विरोधकांनी केलीय.

हरियाणाची राजधानी चंदिगडपासून काही किलोमीटर अंतरावर आहे मेवात.गेल्या काही वर्षात या भागातल्या जमिनीला मोठी मागणी आलीय. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांनाही या जमिनीत रस आहे. त्यांनी इथल्या जमिनी थेट शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या आहेत.

आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार वडरा यांनी 2009 साली मेवातच्या आसपास दोन लाख साठ हजार रुपये प्रति एकरच्या दरानं जमीन खरेदी केली. मेसर्स रिअल अर्थ इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ही खरेदी केलीय आणि या कंपनीचे संचालक आहेत रॉबर्ट वडरा... विशेष म्हणजे मेवातच्या आसपासच्या भूखंडाची कलेक्टर ऑफिसनं काढलेली किंमत आहे तब्बल 16 लाख रुपये प्रति एकर पण वडरा यांनी..रूबी तबस्सूम यांच्याकडून 2 एकर भूखंड 7 लाखांनाआनंद डच फूड इंडिया लिमिटेडकडून 8 एकर भूखंड 20 लाख रुपयांनामेमूनाकडून 2 एकर भूखंड 7 लाख रुपयांनारझियाकडून 2 एकर भूखंड 7 लाख रुपयांनासुभाष चंद यांच्याकडून 2 एकर भूखंड 6 लाख रुपयांना आणिफिरदोस बेगम यांच्याकडून 11 एकर भूखंड 24 लाख रुपयांना खरेदी केला

म्हणजे वडरा यांनी जवळपास 2 लाख 60 हजार रुपये प्रति एकर या दरानं भूखंड खरेदी केले. पण त्यांच्या कंपनीनं या भूखंडासाठी स्टॅम्प ड्युटी मात्र कलेक्टर ऑफिसच्या दरानुसार भरलीय. राजकीय पक्षांनीही आता या खरेदीवर प्रश्न उपस्थित केलेत. हे भूखंड स्थानिक काँग्रेस नेते आफताब अहमद यांच्या कुटुंबीयांकडून घेण्यात आल्याचं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं म्हणणंय. ज्या वेळी हा खरेदी व्यवहार झाला त्याच काळात आफताब अहमद यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.

इंडियन नॅशनल लोक दलाचे स्थानिक आमदार नसीम अहमद यांनीही वडरा आणि हरियाणा सरकारवर टीका केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून इथे जमिनीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पण या जमिनींच्या व्यवहारात हितसंबंध गुंतले असल्याचा त्यांचाही आरोप आहे.

पण ग्रामस्थांचं म्हणणं काही वेगळंच आहे. कलेक्टर ऑफिसनं ठरवलेल्या दरापेक्षा कमी दरानं जमिनी विकणं, ही नित्याचीच बाब असल्याचं गावकरी सांगतात.शेतकर्‍यांनी जरी जमिनी योग्य दरातच विकल्याचा दावा केला असला तरी विरोधकांनी मात्र या सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close