S M L

कर्नाटकी दडपशाही,मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

11 ऑक्टोबरबेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या दादागिरीची उदाहरणं वारंवार समोर येत असताना आज कर्नाटक पोलिसांनी थेट मराठी मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर राष्ट्रपतींच्या दौर्‍याचं वृत्तांकन करण्यासाठी गेले असताना कर्नाटक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याच्याकडील बूम माईक हिसकावून घेतला आणि प्रक्षेपण बंद पाडण्यास भाग पाडलं. हा प्रकार पाहणार्‍या सीमावासीयांनी विरोध केला असता त्यांना न जुमानता पोलिसांनी प्रक्षेपण बंद पाडलं. जवळपास 1 ते दीड तास केळुसकर यांना ताब्यात ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. कर्नाटकी दडपशाहीचा हा अजब कारभार पाहून राज्यभरातून तीव्र निषेध केला जात आहे. आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विधानभवनाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं. राष्ट्रपतींच्या बेळगाव दौर्‍याविरोधात कोल्हापूर,सांगली,सातार्‍यासह बेळगांवमधेही तीव्र निदर्शनं झाली. या निदर्शनात सीमावासीयांसोबत महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना,आरपीआय कार्यकर्तेही सहभागी झाले. राष्ट्रपतींचा हा पूर्वनियोजीत दौरा रद्द व्हावा ही या आंदोलकांची मागणी होती. बेळगांवमधे आतापर्यंत सुमारे 130 आंदोलकांना पोलिसांना स्थानबध्द केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 09:45 AM IST

कर्नाटकी दडपशाही,मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न

11 ऑक्टोबर

बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या दादागिरीची उदाहरणं वारंवार समोर येत असताना आज कर्नाटक पोलिसांनी थेट मराठी मीडियाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. आयबीएन लोकमतचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर राष्ट्रपतींच्या दौर्‍याचं वृत्तांकन करण्यासाठी गेले असताना कर्नाटक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याच्याकडील बूम माईक हिसकावून घेतला आणि प्रक्षेपण बंद पाडण्यास भाग पाडलं. हा प्रकार पाहणार्‍या सीमावासीयांनी विरोध केला असता त्यांना न जुमानता पोलिसांनी प्रक्षेपण बंद पाडलं. जवळपास 1 ते दीड तास केळुसकर यांना ताब्यात ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

कर्नाटकी दडपशाहीचा हा अजब कारभार पाहून राज्यभरातून तीव्र निषेध केला जात आहे. आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विधानभवनाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं. राष्ट्रपतींच्या बेळगाव दौर्‍याविरोधात कोल्हापूर,सांगली,सातार्‍यासह बेळगांवमधेही तीव्र निदर्शनं झाली. या निदर्शनात सीमावासीयांसोबत महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना,आरपीआय कार्यकर्तेही सहभागी झाले. राष्ट्रपतींचा हा पूर्वनियोजीत दौरा रद्द व्हावा ही या आंदोलकांची मागणी होती. बेळगांवमधे आतापर्यंत सुमारे 130 आंदोलकांना पोलिसांना स्थानबध्द केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close