S M L

नागपूरमध्ये जमावाने गुंडाला ठेचून मारले

10 ऑक्टोबरनागपूरमध्ये जमावानं एका गुंडाला ठेचून मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत ही घटना घडली. भुरु उर्फ शेख अक्रम असं या कुख्यात गुंडांचं नाव आहे. भुरु डॉन म्हणून हा गुंड ओळखल्या जायचा. त्याच्या गुंडाची झोपडपट्टीत प्रचंड दहशत होती. ही गुंड झोपडपट्टीत दारु, गांजा अशा अमली पदार्थांची विक्री करायचे. आणि व्यसनी तरुणाना जबरदस्तीनं अवैध धंद्यात ओढायचे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुंड कधीही कुणाच्याही घरात घुसायचे आणि घरातल्या पुरुषांसमोर, स्त्रीवर बलात्कार करायचे. त्यामुळे या झोपडपट्टीतले लोकं प्रचंड दहशतीत होते. त्यातचं या गुडांचं पोलिसांशी साटंलोटं असल्यामुळे लोकं त्याच्याविरुद्ध तक्रार करायलाही घाबरत होते. अखेर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि जवळपास 400 लोकांच्या जमावानं या गुंडावर हल्ला चढवून त्याला ठार केलं.नागपूरमधली ही दुसरी घटनालोकांनी कायदा हातात घेऊन गुंडांना मारण्याची या वर्षातील नागपुरातील ही दुसरी घटना आहे. यावर्षी 8 मे रोजीही लोकांनी नागपूरच्या कळमना भागतील लोकांनी बहुरुपींना दरोडेखोर समजून तीन जणांना ठार मारले होते. यापुर्वीही लोकांनी कोर्टाच्या आवारात साक्षीदारावर हल्ला झाला होता या प्रकरणात 30 जणांना अटक करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2004 रोजी अक्कू यादव या गुंडाला लोकांनी कोर्टातच खून केला होता. 12 ऑक्टोबर 2004 रोजी खरबी परिसरातील लोकांनी नईम निझाम खान पठाण आणि फईम निझाम खान पठाण यांचा लोकांनी खून केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2012 08:08 AM IST

नागपूरमध्ये जमावाने गुंडाला ठेचून मारले

10 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावानं एका गुंडाला ठेचून मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत ही घटना घडली. भुरु उर्फ शेख अक्रम असं या कुख्यात गुंडांचं नाव आहे. भुरु डॉन म्हणून हा गुंड ओळखल्या जायचा. त्याच्या गुंडाची झोपडपट्टीत प्रचंड दहशत होती. ही गुंड झोपडपट्टीत दारु, गांजा अशा अमली पदार्थांची विक्री करायचे. आणि व्यसनी तरुणाना जबरदस्तीनं अवैध धंद्यात ओढायचे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुंड कधीही कुणाच्याही घरात घुसायचे आणि घरातल्या पुरुषांसमोर, स्त्रीवर बलात्कार करायचे. त्यामुळे या झोपडपट्टीतले लोकं प्रचंड दहशतीत होते. त्यातचं या गुडांचं पोलिसांशी साटंलोटं असल्यामुळे लोकं त्याच्याविरुद्ध तक्रार करायलाही घाबरत होते. अखेर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि जवळपास 400 लोकांच्या जमावानं या गुंडावर हल्ला चढवून त्याला ठार केलं.

नागपूरमधली ही दुसरी घटना

लोकांनी कायदा हातात घेऊन गुंडांना मारण्याची या वर्षातील नागपुरातील ही दुसरी घटना आहे. यावर्षी 8 मे रोजीही लोकांनी नागपूरच्या कळमना भागतील लोकांनी बहुरुपींना दरोडेखोर समजून तीन जणांना ठार मारले होते. यापुर्वीही लोकांनी कोर्टाच्या आवारात साक्षीदारावर हल्ला झाला होता या प्रकरणात 30 जणांना अटक करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2004 रोजी अक्कू यादव या गुंडाला लोकांनी कोर्टातच खून केला होता. 12 ऑक्टोबर 2004 रोजी खरबी परिसरातील लोकांनी नईम निझाम खान पठाण आणि फईम निझाम खान पठाण यांचा लोकांनी खून केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2012 08:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close