S M L

नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये 2 कैद्यांची फ्री स्टाईल हाणामारी

12 ऑक्टोबरनाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या नाशिक रोडच्या कैद्यांमध्ये वॉर्डमध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या प्रकरणी अजीत साटम आणि जाफर खान या दोन कैद्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. आजारी असल्याचं कारण दाखवून जेलची हवा टाळून हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या व्हीआयपी कैद्यांची बातमी आयबीएन-लोकमतनं वारंवार प्रकाशात आणली होती. आता साटम आणि खान यांच्यातल्या हाणामारीनं या आजारी कैद्यांच्या आजारपणाचं बिंग फुटलंय. दरम्यान, आय.जी मीरा बोरवणकर यांनी नाशिक रोड जेलमधल्या या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 01:27 PM IST

नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये 2 कैद्यांची फ्री स्टाईल हाणामारी

12 ऑक्टोबर

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या नाशिक रोडच्या कैद्यांमध्ये वॉर्डमध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या प्रकरणी अजीत साटम आणि जाफर खान या दोन कैद्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. आजारी असल्याचं कारण दाखवून जेलची हवा टाळून हॉस्पिटलमध्ये पाहुणचार घेणार्‍या व्हीआयपी कैद्यांची बातमी आयबीएन-लोकमतनं वारंवार प्रकाशात आणली होती. आता साटम आणि खान यांच्यातल्या हाणामारीनं या आजारी कैद्यांच्या आजारपणाचं बिंग फुटलंय. दरम्यान, आय.जी मीरा बोरवणकर यांनी नाशिक रोड जेलमधल्या या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close