S M L

राष्ट्रपती दौर्‍याचे पडसाद, कोल्हापुरात बंदला हिंसक वळण

11 ऑक्टोबरराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या बेळगाव दौर्‍याविरोधात प. महाराष्ट्रात शिवसेनेनं बंद पुकारलाय. सीमाप्रश्नी कोल्हापुरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे असून जिल्ह्यात आज बंद पाळण्यात येतोय.शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली सेनेनं शहरातून रॅली काढून नागरिकांना बंदच आवाहन केलं. यावेळी जवळपास 8 ते 10 रिक्षांवर संतप्त शिवसैनिकांनी देगडफेकही केली. तसंच कोल्हापूर बेळगाव हायवे रोखण्यात आला. त्यामुळे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सांगलीत या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील गणपती पेठ, कापड पेठ यासह अन्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यात. बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातार्‍यात सकाळी बाजार पेठेतील काही दुकानं सुरू होती. मात्र शिवसैनिकांनी ही दुकानं बंद करायला लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 10:05 AM IST

राष्ट्रपती दौर्‍याचे पडसाद, कोल्हापुरात बंदला हिंसक वळण

11 ऑक्टोबर

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या बेळगाव दौर्‍याविरोधात प. महाराष्ट्रात शिवसेनेनं बंद पुकारलाय. सीमाप्रश्नी कोल्हापुरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे असून जिल्ह्यात आज बंद पाळण्यात येतोय.शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली सेनेनं शहरातून रॅली काढून नागरिकांना बंदच आवाहन केलं. यावेळी जवळपास 8 ते 10 रिक्षांवर संतप्त शिवसैनिकांनी देगडफेकही केली. तसंच कोल्हापूर बेळगाव हायवे रोखण्यात आला. त्यामुळे 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सांगलीत या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील गणपती पेठ, कापड पेठ यासह अन्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्यात. बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातार्‍यात सकाळी बाजार पेठेतील काही दुकानं सुरू होती. मात्र शिवसैनिकांनी ही दुकानं बंद करायला लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close