S M L

नागपूर :गुंड शेखच्या हत्येप्रकरणी पोलिस निरीक्षक निलंबित

11 ऑक्टोबरनागपूरमध्ये जमावानं एका गुंडाला ठार केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी सीतबर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. याच भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत मंगळवारी रात्रीसंतप्त जमावानं इक्बाल शेख या गुंडाला ठार केलं होतं. इक्बाल आणि त्याचा भाऊ अक्रम या दोघांच्या दहशतीमुळे आणि महिलांच्या छेडछाडीमुळेइथले लोक त्रस्त झाले होते. पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत इथं लोकांनीच कायदा हातात घेतला. या सर्व प्रकरणात कसूर केल्याचा ठपका ठेवत जाधव यांना निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, दुसरा गुंड आरोपी अकरमला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी महिलांनी मोर्चा काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 10:17 AM IST

नागपूर :गुंड शेखच्या हत्येप्रकरणी पोलिस निरीक्षक निलंबित

11 ऑक्टोबर

नागपूरमध्ये जमावानं एका गुंडाला ठार केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी पोलीस महासंचालकांनी सीतबर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. याच भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीत मंगळवारी रात्रीसंतप्त जमावानं इक्बाल शेख या गुंडाला ठार केलं होतं. इक्बाल आणि त्याचा भाऊ अक्रम या दोघांच्या दहशतीमुळे आणि महिलांच्या छेडछाडीमुळेइथले लोक त्रस्त झाले होते. पण पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत इथं लोकांनीच कायदा हातात घेतला. या सर्व प्रकरणात कसूर केल्याचा ठपका ठेवत जाधव यांना निलंबित करण्यात आलंय. दरम्यान, दुसरा गुंड आरोपी अकरमला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी महिलांनी मोर्चा काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close