S M L

अखेर पुणे स्फोटांचा छडा लागला

11 ऑक्टोबरपुण्यात 1 ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोटांचा अखेर छडा लागला आहे. दिल्ली पोलिसांनी आज इंडियन मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली. कातील सिद्दिकी याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आल्याची कबुली या तिघांनी दिली. हे तिघंही अतिरेकी महाराष्ट्रातले असल्यानं पुन्हा एकदा अतिरेकी संघटनांचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय.1 ऑगस्ट 2012...पुण्यात जंगली महाराज रोडवर एका पाठोपाठ चार स्फोट झाले आणि राज्य पुन्हा एकदा हादरलं. या स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी भीतीचं सावट राज्यभर पसरलं. यामागे कोण आहे याचा शोध महाराष्ट्र एटीएस घेत होते. अखेर, दिल्ली पोलिसांनी या कटाचा छडा लावला. दिल्ली पोलिसांनी अटक केलेले हे तिघं अतिरेकी यासीन भटकळ या इंडियन मुजाहिद्दीनच्या मास्टरमाईंडच्या संपर्कात होते. हे तिघंही महाराष्ट्रातले आहेत. पुण्याचे गुन्हेगार- असद, औरंगबाद जिल्ह्यातील नायगावचा रहिवासी, कॉम्प्युटर तज्ज्ञ - इम्रान खान, नांंदेडचा रहिवासी- सय्यद फिरोज, पुण्याचा रहिवासी, कापडाचा दुकानदार - सय्यद फिरोज याच्या दुकानातील भागिदारांनाही त्याच्या अटकेच्या बातमीनं धक्का बसला स्फोटाचा कट कसा प्रत्यक्षात उतरवला गेला त्याचीही माहिती या तिघांनी दिली. दिल्लीत यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहे. या तिघांकडून मोठ्याप्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली. या तिघांचा दिल्लीसह बिहारमधल्या बोधगया मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचाही त्यांचा कट होता. पण त्यांच्या अटकेमुळे हा कट उधळला गेला आहे. सय्यद फिरोज पुण्याचा रहिवासी पुणे स्फोटांमध्ये पकडलेल्या आरोपींमध्ये सय्यद फिरोज याचाही समावेश आहे. पुण्यातल्या कॅम्प परिसरात त्याचा गारमेंटचा व्यवसाय आहे. तर मोमिन पुर्‍यातल्या मक्का मशिदीजवळ त्याचं घर आहे. पुण्यातच जन्मलेल्या फिरोजचं दहावी पर्यंतच शिक्षण पुण्यातच झालं होतं. पुण्यातल्या शिवाजी मराठा शाळेमध्ये तो शिकला होता. गेल्या 25 तारखेला त्याची शेवटची भेट झाल्याचं त्याचे भागीदार मोहसीन यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तो कुठे होता याबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचंही त्याने म्हणलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2012 11:36 AM IST

अखेर पुणे स्फोटांचा छडा लागला

11 ऑक्टोबर

पुण्यात 1 ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोटांचा अखेर छडा लागला आहे. दिल्ली पोलिसांनी आज इंडियन मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली. कातील सिद्दिकी याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आल्याची कबुली या तिघांनी दिली. हे तिघंही अतिरेकी महाराष्ट्रातले असल्यानं पुन्हा एकदा अतिरेकी संघटनांचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालंय.

1 ऑगस्ट 2012...पुण्यात जंगली महाराज रोडवर एका पाठोपाठ चार स्फोट झाले आणि राज्य पुन्हा एकदा हादरलं. या स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी भीतीचं सावट राज्यभर पसरलं. यामागे कोण आहे याचा शोध महाराष्ट्र एटीएस घेत होते. अखेर, दिल्ली पोलिसांनी या कटाचा छडा लावला.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेले हे तिघं अतिरेकी यासीन भटकळ या इंडियन मुजाहिद्दीनच्या मास्टरमाईंडच्या संपर्कात होते. हे तिघंही महाराष्ट्रातले आहेत.

पुण्याचे गुन्हेगार- असद, औरंगबाद जिल्ह्यातील नायगावचा रहिवासी, कॉम्प्युटर तज्ज्ञ - इम्रान खान, नांंदेडचा रहिवासी- सय्यद फिरोज, पुण्याचा रहिवासी, कापडाचा दुकानदार - सय्यद फिरोज याच्या दुकानातील भागिदारांनाही त्याच्या अटकेच्या बातमीनं धक्का बसला स्फोटाचा कट कसा प्रत्यक्षात उतरवला गेला त्याचीही माहिती या तिघांनी दिली. दिल्लीत यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहे. या तिघांकडून मोठ्याप्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली. या तिघांचा दिल्लीसह बिहारमधल्या बोधगया मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचाही त्यांचा कट होता. पण त्यांच्या अटकेमुळे हा कट उधळला गेला आहे.

सय्यद फिरोज पुण्याचा रहिवासी पुणे स्फोटांमध्ये पकडलेल्या आरोपींमध्ये सय्यद फिरोज याचाही समावेश आहे. पुण्यातल्या कॅम्प परिसरात त्याचा गारमेंटचा व्यवसाय आहे. तर मोमिन पुर्‍यातल्या मक्का मशिदीजवळ त्याचं घर आहे. पुण्यातच जन्मलेल्या फिरोजचं दहावी पर्यंतच शिक्षण पुण्यातच झालं होतं. पुण्यातल्या शिवाजी मराठा शाळेमध्ये तो शिकला होता. गेल्या 25 तारखेला त्याची शेवटची भेट झाल्याचं त्याचे भागीदार मोहसीन यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तो कुठे होता याबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचंही त्याने म्हणलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2012 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close