S M L

सिंचनाची श्वेतपत्रिका येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार ?

12 ऑक्टोबरराज्यातल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी कधी होणार असा सवाल विचारला जातोय. त्यातच आता अखेर जलसंपदा खात्याने सिंचनाची श्‍वेतपत्रिका बनवायला सुरुवात केली आहे अशी माहिती मिळतेय. येत्या हिवाळी अधिवेशनात ही श्वेतपत्रिका मांडली जाणार आहे. श्वेतपत्रिकेबरोबरच जलसंपदा खातं कृती अहवालाही सादर करणार आहे अशीही माहिती मिळतेय. गेल्या दहा वर्षांत शून्य पूर्णांक एक टक्काचं सिंचन क्षमता वाढल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण गेल्या दहा वर्षात राज्याची सिंचन क्षमता 5 पूर्णांक 17 टक्क्यांनी वाढल्याचा सिंचन खात्याचा दावा आहे. याशिवाय 15 टक्क्यांपर्यंत काम झालेल्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात येणार आहे. 70 टक्क्यांपर्यंत काम झालेले प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण करण्याचाही खात्याचा विचार आहे. त्यासाठी 16 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2012 04:48 PM IST

सिंचनाची श्वेतपत्रिका येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार ?

12 ऑक्टोबर

राज्यातल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी कधी होणार असा सवाल विचारला जातोय. त्यातच आता अखेर जलसंपदा खात्याने सिंचनाची श्‍वेतपत्रिका बनवायला सुरुवात केली आहे अशी माहिती मिळतेय. येत्या हिवाळी अधिवेशनात ही श्वेतपत्रिका मांडली जाणार आहे. श्वेतपत्रिकेबरोबरच जलसंपदा खातं कृती अहवालाही सादर करणार आहे अशीही माहिती मिळतेय. गेल्या दहा वर्षांत शून्य पूर्णांक एक टक्काचं सिंचन क्षमता वाढल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण गेल्या दहा वर्षात राज्याची सिंचन क्षमता 5 पूर्णांक 17 टक्क्यांनी वाढल्याचा सिंचन खात्याचा दावा आहे. याशिवाय 15 टक्क्यांपर्यंत काम झालेल्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात येणार आहे. 70 टक्क्यांपर्यंत काम झालेले प्रकल्प 3 वर्षांत पूर्ण करण्याचाही खात्याचा विचार आहे. त्यासाठी 16 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close