S M L

नायब तहसीलदाराला जाळण्याचा वाळू माफियांकडून प्रयत्न

14 ऑक्टोबरजळगाव जिल्ह्यात अमळनेरचे नायब तहसीलदार अशोक जगदेव यांना वाळू माफियांकडून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. बोरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जगदेव यांनी मोहिम उघडली आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास जगदेव यांना उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानं ते या नदीपात्रात पोहोचले आणि त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण वाळू उपसा करणार्‍या चौघांनी जगदेव यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं. जवळच असलेल्या गावकर्‍यांनी धाव घेतल्यानं जगदेव बचावले. दरम्यान, वाळूमाफिया घटनास्थळावरुन पळून गेले. जगदेव यांची फिर्याद घेण्यासाठी पोलीस मात्र टाळाटाळ करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2012 01:00 PM IST

नायब तहसीलदाराला जाळण्याचा वाळू माफियांकडून प्रयत्न

14 ऑक्टोबर

जळगाव जिल्ह्यात अमळनेरचे नायब तहसीलदार अशोक जगदेव यांना वाळू माफियांकडून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. बोरी नदीच्या पात्रातून रात्रंदिवस सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जगदेव यांनी मोहिम उघडली आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास जगदेव यांना उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानं ते या नदीपात्रात पोहोचले आणि त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण वाळू उपसा करणार्‍या चौघांनी जगदेव यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं. जवळच असलेल्या गावकर्‍यांनी धाव घेतल्यानं जगदेव बचावले. दरम्यान, वाळूमाफिया घटनास्थळावरुन पळून गेले. जगदेव यांची फिर्याद घेण्यासाठी पोलीस मात्र टाळाटाळ करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 01:00 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close