S M L

अरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका

13 ऑक्टोबरअरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. रात्रभर ताब्यात ठेवल्यानंतर त्यांची आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यंाची सुटका करण्यात आली. पण आपण सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पुन्हा एकदा केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. आता त्यांनी संसदभवन मार्गावर आंदोलन सुरु केलं आहे. काल शुक्रवारी सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत धरणं आंदोलन केलं. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 10:17 AM IST

अरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका

13 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. रात्रभर ताब्यात ठेवल्यानंतर त्यांची आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यंाची सुटका करण्यात आली. पण आपण सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं पुन्हा एकदा केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. आता त्यांनी संसदभवन मार्गावर आंदोलन सुरु केलं आहे. काल शुक्रवारी सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत धरणं आंदोलन केलं. सलमान खुर्शीद आणि त्यांची पत्नी अपंगांसाठी एक एनजीओ चालवतात. पण या एनजीओमध्ये आर्थिक अफरातफर होत असल्याचा आरोप होतोय. या विरोधात केजरीवाल यांनी अपंगांबरोबर दिल्लीत आंदोलन केलं. या आंदोलकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची मागणी केली. पोलिसांनी काही आंदोलकांना पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली. पण आंदोलकांनी ती फेटाळली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close