S M L

गिरणी कामगारांना दिलासा, बेमुदत उपोषण मागे

13 ऑक्टोबरएमएमआरडीएतर्फे बांधली जाणारी भाडेतत्वावरील घरे गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुंबई विकास नियंत्रण नियमावली म्हणजे डीसी रूलमध्ये बदल करण्याचा विषय विचाराधीन असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना दिलंय. या आश्वासनानंतर गिरणी कामगारांनी आपलं बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडएची 160 स्क्वेअर फुटांची सध्या 1 हजार 700 घरं बांधून तयार आहेत. शिवाय आणखी 37 हजार घरं बांधण्याची एमएमआरडीएची तयारी सुरू आहे. मुंबईतल्या 22 गिरण्यांच्या जागा अजूनही सरकारच्या ताब्यात आलेल्या नाहीत. यापैकी 12 गिरण्यांच्या जमिनीच्या उपलब्धतेबाबतचा आढावा म्हाडाचे आयुक्त, महापालिका आयुक्त आणि गिरणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 10:59 AM IST

गिरणी कामगारांना दिलासा, बेमुदत उपोषण मागे

13 ऑक्टोबर

एमएमआरडीएतर्फे बांधली जाणारी भाडेतत्वावरील घरे गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुंबई विकास नियंत्रण नियमावली म्हणजे डीसी रूलमध्ये बदल करण्याचा विषय विचाराधीन असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना दिलंय. या आश्वासनानंतर गिरणी कामगारांनी आपलं बेमुदत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडएची 160 स्क्वेअर फुटांची सध्या 1 हजार 700 घरं बांधून तयार आहेत. शिवाय आणखी 37 हजार घरं बांधण्याची एमएमआरडीएची तयारी सुरू आहे. मुंबईतल्या 22 गिरण्यांच्या जागा अजूनही सरकारच्या ताब्यात आलेल्या नाहीत. यापैकी 12 गिरण्यांच्या जमिनीच्या उपलब्धतेबाबतचा आढावा म्हाडाचे आयुक्त, महापालिका आयुक्त आणि गिरणी कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close