S M L

नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदान

13 ऑक्टोबरआदर्श घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. स्थापनेपासून ही पालिकेची चौथी निवडणूक आहे. पहिल्यांदा शिवसेना आणि त्यानंतर सलग तीन वेळा काँग्रेसची एकहाती इथं सत्ता होती. यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मानली जात आहे. अशोक चव्हाणांसहित राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनीसुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. या ठिकाणी 81 जागांसाठी 510 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2012 01:11 PM IST

नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदान

13 ऑक्टोबर

आदर्श घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. स्थापनेपासून ही पालिकेची चौथी निवडणूक आहे. पहिल्यांदा शिवसेना आणि त्यानंतर सलग तीन वेळा काँग्रेसची एकहाती इथं सत्ता होती. यावेळी अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच मानली जात आहे. अशोक चव्हाणांसहित राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनीसुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. या ठिकाणी 81 जागांसाठी 510 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2012 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close