S M L

मुंबई हल्ल्याचा परिणाम सिनेमा थिएटरवरही

1 डिसेंबर, मुंबई भाग्यश्री वंजारी मुंबईवर ज्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला तो दिवस होता बुधवार. दर शुक्रवारी मुंबईतल्या सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा रिलिज होतात. पण मुंबईवरचा दहशतवादी हल्ला शनिवार सकाळपर्यंत चालल्यामुळे त्याचा परिणाम बहुतेक सिनेमा थिएटरवरही झाला आहे. सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा लागूनही भीतीपोटी फारसं कोणी बघायला गेलंच नाही. कुलाबा, व्हीटी परिसरांत असणा-या सिनेमा थिएटरवर या दहशतवादी हल्ल्यांचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. या परिसरांतल्या थिएटरवर क्लोजच्या पाट्या झळकत होत्या. काही दिवसांनी परिस्थिती पालटेल असं थिएटर मालकांचं म्हणणं आहे. त्याचेबरोबरीनं झालेलं नुकसान भरून कोण काढणार याचीही चिंता लागून राहिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 11:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close