S M L

डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी मनसेचं मुंडन आंदोलन

15 ऑक्टोबरमुंबईतल्या कांजूरमार्ग परिसरातलं डंपिंग ग्राऊंड हटवण्याच्या मागणीसाठी मनसेनं आज मुंडन आंदोलन केलं. महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी केली. मनसेचे आमदार मंगेश सांगळे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन केलं. विक्रोळीतल्या कन्नमवार नगरमधल्या म्हाडा वसाहतीतल्या लोकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाग घेतला होता. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्तानं सरकारचं श्राद्धही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हायवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या डंपिंग ग्राउंडवर कचर्‍याच्या विघटनाची कोणतीच प्रक्रिया होत नसल्यानं प्रचंड दुर्गंधी आजूबाजुच्या परिसरात पसरलेली असते. त्याविरोधात वारंवार तक्रार करूनही महापालिका कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 07:55 AM IST

डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी मनसेचं मुंडन आंदोलन

15 ऑक्टोबर

मुंबईतल्या कांजूरमार्ग परिसरातलं डंपिंग ग्राऊंड हटवण्याच्या मागणीसाठी मनसेनं आज मुंडन आंदोलन केलं. महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी केली. मनसेचे आमदार मंगेश सांगळे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन केलं. विक्रोळीतल्या कन्नमवार नगरमधल्या म्हाडा वसाहतीतल्या लोकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येनं भाग घेतला होता. सर्वपित्री अमावस्येच्या निमित्तानं सरकारचं श्राद्धही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखून धरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हायवे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या डंपिंग ग्राउंडवर कचर्‍याच्या विघटनाची कोणतीच प्रक्रिया होत नसल्यानं प्रचंड दुर्गंधी आजूबाजुच्या परिसरात पसरलेली असते. त्याविरोधात वारंवार तक्रार करूनही महापालिका कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 07:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close