S M L

वीज नियामक आयोगाने फेटाळले सुब्रतो रथोंचे आरोप

16 ऑक्टोबरसुब्रतो रथोंच्या आरोपात तथ्य नाही असं म्हणतं वीज नियामक आयोगाने रथोंचे आरोप फेटाळले आहेत. महानिर्मितीची याचिका जून 2012 मध्ये नियामक आयोगाने फेटाळली होती. महानिर्मितीचे संच काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय नियमानुसार असल्याचा निर्वाळा आयोगाने दिला होता. महानिर्मितीनं हमी दिलेली वीज मिळाली नाही म्हणून महागडी वीज द्यावी लागली, असा खुलासा महापारेषण कंपनीने आयबीएन लोकमतकडे केला आहे. काल सोमवारी महानिर्मितीचे माजी एमडी सुब्रतो रथोंनी सरकारी कंपनीला डावलून खासगी कंपन्यांकडून महागडी वीज खरेदी केल्याचा त्यांचा दावा आहे. 2 रुपये 72 पैसे प्रति युनिट मिळणारी वीज 4 रुपये 10 पैशांनी खरेदी केली. त्यामुळे सरकारला 30 कोटींचा फटका बसला आहे. विशेष म्हणजेय हा सर्व गैरव्यवहार झाला त्यावेळी ऊर्जाखातं अजित पवार यांच्याकडे होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2012 11:25 AM IST

वीज नियामक आयोगाने फेटाळले सुब्रतो रथोंचे आरोप

16 ऑक्टोबर

सुब्रतो रथोंच्या आरोपात तथ्य नाही असं म्हणतं वीज नियामक आयोगाने रथोंचे आरोप फेटाळले आहेत. महानिर्मितीची याचिका जून 2012 मध्ये नियामक आयोगाने फेटाळली होती. महानिर्मितीचे संच काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय नियमानुसार असल्याचा निर्वाळा आयोगाने दिला होता. महानिर्मितीनं हमी दिलेली वीज मिळाली नाही म्हणून महागडी वीज द्यावी लागली, असा खुलासा महापारेषण कंपनीने आयबीएन लोकमतकडे केला आहे. काल सोमवारी महानिर्मितीचे माजी एमडी सुब्रतो रथोंनी सरकारी कंपनीला डावलून खासगी कंपन्यांकडून महागडी वीज खरेदी केल्याचा त्यांचा दावा आहे. 2 रुपये 72 पैसे प्रति युनिट मिळणारी वीज 4 रुपये 10 पैशांनी खरेदी केली. त्यामुळे सरकारला 30 कोटींचा फटका बसला आहे. विशेष म्हणजेय हा सर्व गैरव्यवहार झाला त्यावेळी ऊर्जाखातं अजित पवार यांच्याकडे होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close