S M L

काँग्रेसच्या शहराध्यक्षाने दलित महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

16 ऑक्टोबरस्वस्त धान्य दुकानाचा परवाना माझ्या नावाने कर या मागणीसाठी एका दलित महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडणाचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडला आहे. या प्रकरणामुळे नांदेड शहराला एकच हादरा बसला आहे. या प्रकरणी हिमायतनगर काँग्रेसच्या शहराध्यक्षासह इतर नऊ जणांविरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज संध्याकाळच्या सुमारास ही भयानक घटना घडली. शहराध्यक्ष अब्दुल बाकी अब्दुल करीम यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, याबाबतची तक्रार कालच या महिलेने हिमायतनगर पोलीस स्टेशनकडे दिली होती. पण पोलिसांकडून या तक्रारीला दाद मिळाली नाही. परिणामी आज संध्याकाळी ही महिला आपल्या घरी परतत असताना अब्दुल करीम यांनी तिला ट्रॅक्टरच्या धडकेने आधी खाली पाडलं आणि नंतर तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टर घातला आणि त्याखाली तिला चिरडलं. ही क्रुर घटना अनेकांनी समोर पाहिलीही. या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्षासह नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे सगळे आरोपी फरार आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2012 04:20 PM IST

काँग्रेसच्या शहराध्यक्षाने दलित महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले

16 ऑक्टोबर

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना माझ्या नावाने कर या मागणीसाठी एका दलित महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडणाचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडला आहे. या प्रकरणामुळे नांदेड शहराला एकच हादरा बसला आहे. या प्रकरणी हिमायतनगर काँग्रेसच्या शहराध्यक्षासह इतर नऊ जणांविरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज संध्याकाळच्या सुमारास ही भयानक घटना घडली. शहराध्यक्ष अब्दुल बाकी अब्दुल करीम यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, याबाबतची तक्रार कालच या महिलेने हिमायतनगर पोलीस स्टेशनकडे दिली होती. पण पोलिसांकडून या तक्रारीला दाद मिळाली नाही. परिणामी आज संध्याकाळी ही महिला आपल्या घरी परतत असताना अब्दुल करीम यांनी तिला ट्रॅक्टरच्या धडकेने आधी खाली पाडलं आणि नंतर तिच्या डोक्यावरून ट्रॅक्टर घातला आणि त्याखाली तिला चिरडलं. ही क्रुर घटना अनेकांनी समोर पाहिलीही. या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्षासह नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे सगळे आरोपी फरार आहेत. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close