S M L

गडकरींच्या कारखान्यातून कोळशापासूनही वीजनिर्मिती

18 ऑक्टोबरअरविंद केजरीवाल यांच्या आरोपाचे नितीन गडकरींनी खंडन केलं. पण त्यांच्याच पूर्ती साखर कारखान्याच्या वीजनिर्मितीसाठी 1.31 दक्षलक्ष घनमीटर पाणी वळवण्यात आल्याचं आरटीआयमधून उघड झालंय. गडकरींच्या अखत्यारितल्या पूर्ती पॉवर प्रोजेक्टमध्ये ऊसाच्या चिपाडाबरोबरच कोळशावरसुद्धा वीज निर्मिती होते. या प्रकल्पाला बहुतेक परवानग्या तसंच लोअर वेणा वडगाव धरणाचं पाणी को जनरेशन प्रकल्प म्हणून दिलं गेलं. पण प्रत्यक्षात मात्र वर्षभर कोळशावरच वीज निर्मिती होते. एवढंच नाही तर या प्रकल्पाशेजारीच आयडीयल थर्मल पावर प्रोजेक्ट या नावानं 540 मेगा वॅटचा प्रकल्प उभा राहतोय. हा प्रकल्प आयआरबीचे म्हैसकर आणि गडकरींच्या सहकार्यातून उभा राहत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या वेणा वडगाव धरणातून पूर्ती आणि आयडीएल थर्मल प्रोजक्टला सिंचनाचं पाणी वळतं केलं गेलं त्या धरणाच्या 100 ते 150 मीटर अंतरातच हे दोन्ही प्रकल्प उभारले गेले आहेत. हे सरळ सरळ पर्यावरण कायद्याचं उल्लंघन असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2012 03:43 PM IST

गडकरींच्या कारखान्यातून कोळशापासूनही वीजनिर्मिती

18 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांच्या आरोपाचे नितीन गडकरींनी खंडन केलं. पण त्यांच्याच पूर्ती साखर कारखान्याच्या वीजनिर्मितीसाठी 1.31 दक्षलक्ष घनमीटर पाणी वळवण्यात आल्याचं आरटीआयमधून उघड झालंय. गडकरींच्या अखत्यारितल्या पूर्ती पॉवर प्रोजेक्टमध्ये ऊसाच्या चिपाडाबरोबरच कोळशावरसुद्धा वीज निर्मिती होते. या प्रकल्पाला बहुतेक परवानग्या तसंच लोअर वेणा वडगाव धरणाचं पाणी को जनरेशन प्रकल्प म्हणून दिलं गेलं. पण प्रत्यक्षात मात्र वर्षभर कोळशावरच वीज निर्मिती होते. एवढंच नाही तर या प्रकल्पाशेजारीच आयडीयल थर्मल पावर प्रोजेक्ट या नावानं 540 मेगा वॅटचा प्रकल्प उभा राहतोय. हा प्रकल्प आयआरबीचे म्हैसकर आणि गडकरींच्या सहकार्यातून उभा राहत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या वेणा वडगाव धरणातून पूर्ती आणि आयडीएल थर्मल प्रोजक्टला सिंचनाचं पाणी वळतं केलं गेलं त्या धरणाच्या 100 ते 150 मीटर अंतरातच हे दोन्ही प्रकल्प उभारले गेले आहेत. हे सरळ सरळ पर्यावरण कायद्याचं उल्लंघन असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2012 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close