S M L

ठाणे पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी रविंद्र फाटक

16 ऑक्टोबरस्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी झाले. आणि तब्बल 21 वर्षांनंतर ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती आल्या. ठाणे महापालिकेत गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या स्थायी नाट्यावर आता पडदा पडलाय. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रवींद्र फाटकांची निवड झाल्यानं सत्ताधारी शिवसेनेला धक्का बसला आहे. आघाडीच्या फाटकांनी महायुतीच्या विलास कांबळेंचा पराभव केला. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडल्यानं, चिठ्ठी टाकून हा निर्णय घेण्यात आला.महापौर शिवसेनेचे असले तरी आर्थिक चाव्या मात्र आता आघाडीकडे असलेल्या स्थायी समितीकडे असतील. त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरलीये. काँग्रेसनं दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 6 महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या, त्यानंतर विरोधीपक्षनेतेपदाच्या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टात गेलं. आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीवरुन,पुन्हा विरोधक कोर्टात गेले.त्यामुळे ठाण्यातलं राजकारण ढवळून निघालं.जवळपास 21 वर्षांनंतर शिवसेनेच्या हातून स्थायी समितीच्या चाव्या काँग्रेसनं हिसकावल्यात. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला डोकेदुखी ठरणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2012 10:35 AM IST

ठाणे पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी रविंद्र फाटक

16 ऑक्टोबर

स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे रवींद्र फाटक विजयी झाले. आणि तब्बल 21 वर्षांनंतर ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती आल्या. ठाणे महापालिकेत गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या स्थायी नाट्यावर आता पडदा पडलाय. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रवींद्र फाटकांची निवड झाल्यानं सत्ताधारी शिवसेनेला धक्का बसला आहे. आघाडीच्या फाटकांनी महायुतीच्या विलास कांबळेंचा पराभव केला. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांना समसमान मतं पडल्यानं, चिठ्ठी टाकून हा निर्णय घेण्यात आला.

महापौर शिवसेनेचे असले तरी आर्थिक चाव्या मात्र आता आघाडीकडे असलेल्या स्थायी समितीकडे असतील. त्यामुळे सेनेच्या गोटात निराशा पसरलीये. काँग्रेसनं दगाबाजी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. 6 महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या, त्यानंतर विरोधीपक्षनेतेपदाच्या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टात गेलं. आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीवरुन,पुन्हा विरोधक कोर्टात गेले.त्यामुळे ठाण्यातलं राजकारण ढवळून निघालं.जवळपास 21 वर्षांनंतर शिवसेनेच्या हातून स्थायी समितीच्या चाव्या काँग्रेसनं हिसकावल्यात. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला डोकेदुखी ठरणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2012 10:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close