S M L

..तर 6 डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेऊ -आठवले

22 ऑक्टोबरयेत्या 5 डिसेंबरपर्यंत इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली नाही तर 6 डिसेंबरला जागा ताब्यात घेऊ असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. आज सोमवारी आठवले यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिलच्या जागेसाठी चैत्यभूमीवरून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात 500 पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागिल वर्षी सहा डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये प्रवेश करुन मिल ताब्यात घेतली होती. स्मारकासाठी संपूर्ण साडेबारा एकरची जागा जागा स्मारकासाठी द्यावी अशी मागणी केली होती. येत्या 6 डिसेंबरला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतं आहे. गेल्या वर्षभरात इंदू मिलसाठी रिपाइंच्या वतीने राज्यभरात वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली केंद्रानेही आपली मंजुरी असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे इंदू मिलच्या जागेची मागणी केली होती. लवकरच स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण अजूनही अंतिम निर्णय प्रलंबित आहे. आज पुन्हा एकदा रिपाइंने आंदोलनाचे हत्यार उपसत पुन्हा एकदा इंदू मिलचा ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 11:33 AM IST

..तर 6 डिसेंबरला इंदू मिल ताब्यात घेऊ -आठवले

22 ऑक्टोबर

येत्या 5 डिसेंबरपर्यंत इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली नाही तर 6 डिसेंबरला जागा ताब्यात घेऊ असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला. आज सोमवारी आठवले यांच्या नेतृत्वाखाली इंदू मिलच्या जागेसाठी चैत्यभूमीवरून मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात 500 पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागिल वर्षी सहा डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये प्रवेश करुन मिल ताब्यात घेतली होती. स्मारकासाठी संपूर्ण साडेबारा एकरची जागा जागा स्मारकासाठी द्यावी अशी मागणी केली होती. येत्या 6 डिसेंबरला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होतं आहे. गेल्या वर्षभरात इंदू मिलसाठी रिपाइंच्या वतीने राज्यभरात वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली केंद्रानेही आपली मंजुरी असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे इंदू मिलच्या जागेची मागणी केली होती. लवकरच स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण अजूनही अंतिम निर्णय प्रलंबित आहे. आज पुन्हा एकदा रिपाइंने आंदोलनाचे हत्यार उपसत पुन्हा एकदा इंदू मिलचा ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close