S M L

रिक्षाचालक नमले, डोंबिवलीकर जिंकले

17 ऑक्टोबरअखेर डोंबिवली विरुद्ध रिक्षावालाच्या लढ्यात डोंबिवलीकरांचा विजय झाला आहे. हकीम समितीच्या शिफारशींनंतर करण्यात आलेल्या रिक्षा भाडेवाढीचा डोंबिवलीकरांनी जोरदार विरोध करत रिक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्याचा परिणाम म्हणून रिक्षा संघटनांनी वाढलेल्या दरात कपात केली आहे. प्रवाशांच्यावतीने डोंबिवलीतले भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी रिक्षा संघटनांशी चर्चा केल्यानंतर रिक्षा भाडेवाढीत 2 रुपये ते 15 रुपयांपर्यंत रिक्षा भाडेवाढ कमी करण्यात आलीय. संपूर्ण महाराष्ट्रात डोंबिवली हे असं एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी ही भाडेवाढ कमी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2012 02:45 PM IST

रिक्षाचालक नमले, डोंबिवलीकर जिंकले

17 ऑक्टोबर

अखेर डोंबिवली विरुद्ध रिक्षावालाच्या लढ्यात डोंबिवलीकरांचा विजय झाला आहे. हकीम समितीच्या शिफारशींनंतर करण्यात आलेल्या रिक्षा भाडेवाढीचा डोंबिवलीकरांनी जोरदार विरोध करत रिक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्याचा परिणाम म्हणून रिक्षा संघटनांनी वाढलेल्या दरात कपात केली आहे. प्रवाशांच्यावतीने डोंबिवलीतले भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी रिक्षा संघटनांशी चर्चा केल्यानंतर रिक्षा भाडेवाढीत 2 रुपये ते 15 रुपयांपर्यंत रिक्षा भाडेवाढ कमी करण्यात आलीय. संपूर्ण महाराष्ट्रात डोंबिवली हे असं एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी ही भाडेवाढ कमी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2012 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close