S M L

औरंगाबाद महापौरपदावरून युतीत धुसफूस

19 ऑक्टोबरऔरंगाबादच्या महापौरपदावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं दिसत आहे. 29 ऑक्टोबरला महापौरपदाची निवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपाला महापौरपद द्यावं अशी मागणी भाजपाने केली आहे. पण शिवसेनेचाच महापौर होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातली धूसफूस वाढलीय. एप्रिल 2009 पासून शिवसेना भाजप युतीची सत्ता औरंगाबाद महापालिकेमध्ये आहे. त्यात शिवसेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर अशी वाटणी केली आहे. अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या महापौरपदासाठी 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2012 04:19 PM IST

औरंगाबाद महापौरपदावरून युतीत धुसफूस

19 ऑक्टोबर

औरंगाबादच्या महापौरपदावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हं दिसत आहे. 29 ऑक्टोबरला महापौरपदाची निवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपाला महापौरपद द्यावं अशी मागणी भाजपाने केली आहे. पण शिवसेनेचाच महापौर होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातली धूसफूस वाढलीय. एप्रिल 2009 पासून शिवसेना भाजप युतीची सत्ता औरंगाबाद महापालिकेमध्ये आहे. त्यात शिवसेनेचा महापौर आणि भाजपाचा उपमहापौर अशी वाटणी केली आहे. अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या महापौरपदासाठी 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2012 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close