S M L

राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं -पवार

20 ऑक्टोबरसिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. वस्तुस्थिती जाणून न घेता जलसंपदा विभागाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप यावेळी पवारांनी केलाय. तसंच शरद पवारांनी लवासाच्या मुद्दयावरुन करण्यात आलेले आरोपही फेटाळले आहे. उलट लवासामुळे राज्याचा फायदाच झाल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसाचं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात सुरु आहे त्यावेळी ते बोलत होते.शरद पवारांनी आपले पुतणे अजित पवारांची पाठराखण करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. कोणत्याही वस्तुची शहानिशा न करता आज कोणीही कोणावर आरोप करत आहे. सिंचन क्षेत्रात 0.1 टक्क्याने वाढ झाली म्हणे, पण खरी आकडेवारी तपासून पाहिली असतात 7 ते 8 टक्क्याने ही वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मग असले खोटे आरोप का ? मुळात धरणंही फक्त शेतीसाठी बांधली असा अर्थ होत नाही याचा बारकीने विचार केला पाहिजे अगोदर पाणी पिण्यासाठी हवे मग शेतीसाठी असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच कोणाला श्वेतपत्रिका काढयाची असेल तर खुशाला काढा पण वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि लोकांसमोर सत्य आलं पाहिजे असा सल्लावजा टोला पवारांनी काँग्रेसला लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2012 09:52 AM IST

राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं -पवार

20 ऑक्टोबर

सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. वस्तुस्थिती जाणून न घेता जलसंपदा विभागाला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप यावेळी पवारांनी केलाय. तसंच शरद पवारांनी लवासाच्या मुद्दयावरुन करण्यात आलेले आरोपही फेटाळले आहे. उलट लवासामुळे राज्याचा फायदाच झाल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवसाचं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात सुरु आहे त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी आपले पुतणे अजित पवारांची पाठराखण करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. कोणत्याही वस्तुची शहानिशा न करता आज कोणीही कोणावर आरोप करत आहे. सिंचन क्षेत्रात 0.1 टक्क्याने वाढ झाली म्हणे, पण खरी आकडेवारी तपासून पाहिली असतात 7 ते 8 टक्क्याने ही वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मग असले खोटे आरोप का ? मुळात धरणंही फक्त शेतीसाठी बांधली असा अर्थ होत नाही याचा बारकीने विचार केला पाहिजे अगोदर पाणी पिण्यासाठी हवे मग शेतीसाठी असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच कोणाला श्वेतपत्रिका काढयाची असेल तर खुशाला काढा पण वस्तुस्थिती लक्षात घ्या आणि लोकांसमोर सत्य आलं पाहिजे असा सल्लावजा टोला पवारांनी काँग्रेसला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close