S M L

9 सिलिंडर देण्याबाबत सरकारचं तळ्यात मळ्यात

22 ऑक्टोबरमहागाईत होरपाळणार्‍या जनतेला डिझेलच्या दरात वाढ आणि सिलिंडरमध्ये मर्यादा घालून सर्वसामान्यांचे पुरतं कंबरडं मोडलंय. चौहीबाजूने या दरवाढीचा निषेध करण्यात आला. एनडीएनं भारत बंदची आंदोलन करून काही आपला निषेध नोंदवला. याची दखल घेत काँग्रेसने ज्या राज्यात आपली सत्ता आहे तिथे जनतेला दिलासा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर देण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सवलतीच्या सिलिंडरच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत सरकारचं अजूनही तळ्यातमळ्यात आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांची एकदा बैठकसुद्धा झाली. पण याबाबतचा प्रस्ताव अजूनही आपल्यापर्यंत आलेलाच नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 01:34 PM IST

9 सिलिंडर देण्याबाबत सरकारचं तळ्यात मळ्यात

22 ऑक्टोबर

महागाईत होरपाळणार्‍या जनतेला डिझेलच्या दरात वाढ आणि सिलिंडरमध्ये मर्यादा घालून सर्वसामान्यांचे पुरतं कंबरडं मोडलंय. चौहीबाजूने या दरवाढीचा निषेध करण्यात आला. एनडीएनं भारत बंदची आंदोलन करून काही आपला निषेध नोंदवला. याची दखल घेत काँग्रेसने ज्या राज्यात आपली सत्ता आहे तिथे जनतेला दिलासा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर देण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सवलतीच्या सिलिंडरच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत सरकारचं अजूनही तळ्यातमळ्यात आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांची एकदा बैठकसुद्धा झाली. पण याबाबतचा प्रस्ताव अजूनही आपल्यापर्यंत आलेलाच नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close