S M L

लान्स आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी

22 ऑक्टोबरआंतरराष्ट्रीय सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशननं ही कारवाई केली. त्याची टूर दी फ्रान्सची 7 जेतेपदंही काढून घेण्यात आली आहे. कँसरशी यशस्वी लढा देणार्‍या लान्सनं सायकलिंगच्या विश्वात मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे अवघ्या क्रीडा जगातात तो आदर्श ठरला होता. पण त्याला डोपिंगच्या आरोपांनी घेरलं. अमेरिकेच्या डोपिंग विरोधी संस्थेनं आर्मस्ट्राँगला कोर्टात खेचलं. संस्थेनं त्याच्याविरोधात 1000 पानी पुरावे सादर केले. त्यात लान्सच्या 11 माजी सहकार्‍यांसह 26 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आला. या सर्वांनी लान्स हा उत्तेजक द्रव्य घेत असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे लान्सच्या कँन्सर लढाईवर एक पुस्तकही प्रकाशित झाले. भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगला कँन्सरने घेरलं होतं तेंव्हा युवराजने लान्स आर्मस्ट्राँगचा आदर्श मनाशी बाळगला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2012 02:12 PM IST

लान्स आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी

22 ऑक्टोबर

आंतरराष्ट्रीय सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशननं ही कारवाई केली. त्याची टूर दी फ्रान्सची 7 जेतेपदंही काढून घेण्यात आली आहे. कँसरशी यशस्वी लढा देणार्‍या लान्सनं सायकलिंगच्या विश्वात मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे अवघ्या क्रीडा जगातात तो आदर्श ठरला होता. पण त्याला डोपिंगच्या आरोपांनी घेरलं. अमेरिकेच्या डोपिंग विरोधी संस्थेनं आर्मस्ट्राँगला कोर्टात खेचलं. संस्थेनं त्याच्याविरोधात 1000 पानी पुरावे सादर केले. त्यात लान्सच्या 11 माजी सहकार्‍यांसह 26 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आला. या सर्वांनी लान्स हा उत्तेजक द्रव्य घेत असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे लान्सच्या कँन्सर लढाईवर एक पुस्तकही प्रकाशित झाले. भारताचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगला कँन्सरने घेरलं होतं तेंव्हा युवराजने लान्स आर्मस्ट्राँगचा आदर्श मनाशी बाळगला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2012 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close